डेंग्यूनंतर टायगर श्रॉफची अशी झाली अवस्था, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Tiger Shroff Recovers From Dengue | बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या डान्स आणि अॅक्शन सीनमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. अलीकडेच त्याला डेंग्यू झाला होता. ज्यानंतर त्याने शेअर केलेला फोटो पाहून चाहते त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘हा फोटो मी डेंग्यूतून बरे झाल्यावर काढला होता’. या फोटोत नेहमीच फिटनेस आणि आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या टायगरचा कोमजलेला चेहरा पाहून चाहते त्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत पडले आहेत.
View this post on Instagram
टायगरची आई आयशा श्रॉफनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. आपल्या मुलाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी रडणारा इमोजी टाकला आहे. टायगरच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक चाहत्यांनी ‘गेट वेल सून’ असे लिहिले आहे. Tiger Shroff Recovers From Dengue |
टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘बागी 4’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरशिवाय संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत तीन भाग रिलीज झाले असून चौथ्या भागाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
तर अलिकडेच टायगर हा ‘सिंघम अगेन’ मध्ये झळकला होता. ज्यामध्ये त्याची सहायक भूमिका होती. याआधी त्याचा ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट आला होता, मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. Tiger Shroff Recovers From Dengue |
हेही वाचा:





