Kajol : काजोलची ही स्टाईल नाहीच! अभिनेत्रीच्या टाईट ड्रेसवरून चाहते संतापले; व्हिडीओ व्हायरल

Kajol : बॅालिवूड कलाकारांना कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ट्रोलिंगचा सामाना करावा लागतो. आता हे ट्रोलिंग त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे असतं किंवा मग त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे. याशिवाय ट्रोलिंगची इतर अनेक कारणंही असू शकतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर बॅालिवूड अभिनेत्री काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिने जो ड्रेस परिधान केला आहे, त्यावरून नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल केलं जात आहे.
बॅालिवूड अभिनेत्री काजोल हिने नुकतेच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तिने एक वेगळा लूक केला होता. या कार्यक्रमात ती काळ्या रंगाच्या टाईट ड्रेसमध्ये दिसली. या टाईट ड्रेसवरून तिला ट्रोल केलं जात आहे. काजोल हि अशी अभिनेत्री आहे जी तिच्या सिंपल ड्रेसिंग स्टाईलमुळे लोकप्रिय आहे, पण तिने या कार्यक्रमासाठी परिधान केलेला जो टाईट ड्रेस आहे, तो पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये काजोलने ज्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. त्या कार्यक्रमाची ती प्रमुख पाहुणी होती. व्हिडीओमध्ये काजोल स्टेजकडे चालत जाताना दिसत आहे, यावेळी ती हसत आहे. जेव्हा ती चालते त्यावेळी तिने परिधान केलेला काळ्या रंगाच्या ड्रेस किती टाइट आहे, याची प्रचिती येते. यामुळे आता तिची ही स्टाईल अनेकांना खटकली आहे, तिच्या चाहत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काजोलच्या ड्रेसिंग सेन्सला ट्रोल करताना एका युजरने लिहिले, ‘खूपच वाईट ड्रेसिंग सेन्स.’ दुसऱ्या युजरने कमेंट केली, ‘एवढा टाइट ड्रेस का? भारतीय ड्रेस घाला, त्यात तुमचे पोट दिसत नाही.’ अशा काही कमेंट्स काजोलच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा : Jaswinder Bhalla: जसविंदर भल्ला यांच्या निधनाने अक्षय कुमार भावुक; म्हणाला “तुस्सी बहुत याद आओगे भल्ला जी”





