याला म्हणतात Respect ! जेव्हा अशोक सराफ समोर येतात… ; अभिनेते सुनील बर्वेंनी केली ती कृती, Video पाहा…

Viral video : उद्या १२ सप्टेंबर या दिवशी मराठीत तीन सिनेमे रिलीज होत आहेत. आरपार, दशावतार आणि बिन लग्नाची गोष्ट. हे तीनही सिनेमे ताकदीचे आहेत. यामुळे चांगला प्रेक्षकवर्ग या सिनेमांना मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, दुसरीकडे मराठी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग कमी झाला आहे किंवा मग सिनेमाला स्क्रिन मिळत नाहीत, हे सातत्याने बोललं जातं; पण मराठीत हे तिन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज करून काय साध्य केलं असं देखील अनेक जण विचारू लागले आहेत. असो…!
नुकतच बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाच स्पेशन स्क्रिनिंग पार पडलं. या स्क्रिनिंगला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटिंंनी हजेरी लावली होती. सिनेमाच कौतुक करण्यात आलं. या सिनेमात अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेते सुनील बर्वे यांनी देखील हजेरी लावली होती. सिनेमाच्या स्क्रिनच्या वेळी अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने केलेल्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
View this post on Instagram
अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. रंजनीकांत यांच्या कुली या सिनेमाच्या रिलीजपूर्वी एक इव्हेन्ट पार पडला होता. या इव्हेन्टमध्ये बॅालिवूड अभिनेता आमिर खान हा अभिनेते रजनीकांत यांच्या पाया पडला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या कृतीतून आमिरने आपल्या पेक्षा कलाविश्वाचा मोठा अनुभव घेतलेल्या रजनीकांत यांचा आदर व्यक्त केला होता.
काय घडलं?
आता मराठीतील अभिनेते सुनील बर्वे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पाया पडतानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कृतीतून त्यांनी अशोक सराफ यांच्याबद्दल असणारा आदर व्यक्त केला आहे. या व्हिडीओत सुनील बर्वे हे अशोक सराफ यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकतात. त्यावेळी अशोक सराफ हे त्यांच्या हातात देतात असं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : लक्ष मुंबई महापालिका! शिंदेंच्या २१ शिलेदारांची फौज रणांगणात उतरणार; शिवसेनेची मुख्य कार्यकारणी समिती जाहीर





