नवी दिल्ली: देशातील करोना रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच स्तरावर याची अंमलबजावणी केली आहे. मात्र, करोनाची लस मिळवण्यासाठी नागरिकांना अजूनही धडपड करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. लस मिळवण्यासाठी काही लोक पैसे देत आहेत तर अनेकजण तर तासन्तास रांगेत उभा राहून लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते पाहून तुम्हाला धक्का तर बासेलच पण तुम्हाला हसू देखील आवरणार नाही…
इस जोश को सैल्यूट रहेगा😂😂😂😂 pic.twitter.com/h40FWE9dPv
— पनौति (@panauti96) August 14, 2021
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती दोन भींतीच्या मध्ये उभी आहे. ती खिडकीत डोकावते. त्यानंतर त्याला लस दिली जाते. बाहेर अनेक लोक रांगेत लाटकळत उभे आहेत. रांगेत उभे न राहता लस मिळवण्यासाठी या व्यक्तीने हा जुगाड केलेला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
अब कोरोना का टीका 💉 लेना हुआ और भी आसान…!
विशिष्ट व्यवस्थाओं के लिए सरकार को बहुत-बहुत धन्यवाद 🙏 pic.twitter.com/ZbqpnjLXTt
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) August 13, 2021
हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओवर नेटीझन्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोणी म्हणतंय याला म्हणतात ‘ऑन’ ‘लाईन’ टीकाकरण. तरं दुसरा एकजण म्हणतोय की काकांची गर्लफ्रेंड नर्स असेल.
इसी को बोलते हैं online टिका लगवाना
क्या करे 4G ने सब कुछ आसान कर दिया😂😂😂😂😂😂— Dev Kumar yadav (@DevKuma75403779) August 13, 2021
अनेकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत या मजेशीर व्हिडिओचा आनंद घेतला आहे.