‘हे भगवं सरकार आहे.. इथे हिरव्यांची मस्ती चालणार नाही, उद्धव ठाकरेंसारख्या…’ – आचार्य तुषार भोसले

नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिरात 10 ते 12 जणांच्या जमावाने शनिवारी रात्री बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाला होता. मात्र, आता या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, एका नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरातील या घटनेवर राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अश्यातच आता भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आपल्या व्हिडीओत तुषार भोसले म्हणतात, “हे भगवं सरकार आहे… इथे हिरव्यांची मस्ती चालणार नाही, उद्धव ठाकरेंसारख्या लेच्यापेच्या लोकांचे हे सरकार नाही..’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केला आहे. तसेच ते पुढे म्हणतात, त्र्यंबकेश्वरच्या प्रकरणात गुन्हा नोंदवून SIT स्थापन केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार.’ असं देखील ते आपल्या व्हिडिओत म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय? वाचा…
संदल मिरवणुकीतील 10 ते 12 जणांनी शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारासमोर फुलांची चादर घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर धर्मीयांना प्रवेशास मनाई असल्याचे सांगत सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. मात्र तरीही त्या व्यक्तींनी हट्ट कायम ठेवला. त्यामुळे काही वेळ वाद निर्माण झाला.
नंतर मिरवणूक पुढे गेली. पोलिसांनी मंदिरासमोरील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करून या युवकांना नोटीस बजावली. मात्र कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे. पुरोहित संघ, ब्राह्मण महासंघ, मराठा महासंघासह 15 संघटनांनी पोलिसांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.





