‘या’ हेअर स्टायलिस्टने धोनीपासून ते कोहलीपर्यंत त्यांच्यासोबत केलंय काम ; फी वाचून बसेल तुम्हाला धक्का

Aleem Hakim । विराट कोहली हा क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर स्टाईल आणि फॅशन बद्दलही तरुण पिढी त्याचे अनुकरण करत असते. विशेषत: सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये त्याची हेअर स्टाईल फारच चर्चेत आलेली आहे. त्याच्या या हेअर स्टाईल करण्यात ज्यांचा हात आहे त्यांचे नाव आहे अलीम हकीम. अर्थात ते अनेक क्रिकेटपटूंसोबत हेअर ड्रेसर म्हणून काम करतात. त्यामध्ये धोनीचाही समावेश आहे. हकीम यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे वर्णन करताना म्हटले आहे, की तो कुठल्याही हॉलीवुड एक्टर पेक्षा कमी देखणा नाही.
हकीम यांनी नुकतीच त्यांच्या या कामाबद्दल तपशीलवार माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर ते हेअर स्टाईलसाठी आकारत असलेल्या शुल्क ही सांगितलेले आहे. त्यानुसार ते हेअर स्टाईलच्या एका सेशनसाठी कमीत कमी एक लाख रुपये घेतात.
कोहली सोबत हेअर स्टाईलिंगची प्रोसेस कशी घडत गेली हे सांगताना त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंबरोबर त्यांचे दीर्घकाळ हेअर ड्रेसर म्हणून कसे नाते राहिलेले आहे याची ही माहिती दिलेली आहे. ते म्हणतात, की नव्या लुकसाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने अनेक खेळाडू माझ्याकडे येत असतात. कोहलीच्या नव्या हेअर स्टाईल मध्ये त्याच्या भुवईवर किंचितशी खाच तयार केलेली आपल्याला दिसते. त्याखेरीज दोन्ही कानांवर फेडेड स्टाईल करण्यात आलेली आहे. केसांचा किंचित बदललेला रंग लोकांचे लक्ष वेधून घेतो.
ब्रुट इंडियाशी बोलताना हकीम म्हणतात, माझी फी अगदी साधी आहे आणि ती सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी कमीत कमी एक लाखापासून सुरुवात करतो. माही सर आणि विराट हे माझे जुने मित्र आहेत. अनेक वर्षांपासून ते हेअरकट साठी माझ्याकडे येतात. या आयपीएलसाठी विराट बरोबर किंचितसा कूल आणि वेगळ्या प्रयोग आम्ही केलेला आहे. विराट नेहमीच माझ्याकडे वेगवेगळे संदर्भ घेऊन येत असतो आणि त्याच्या कल्पना सांगत असतो.
आपल्याला हे ट्राय करून बघायचे आहे किंवा आपण ही गोष्ट पुढच्या वेळी ट्राय करू, असे विराट सांगत असतो. त्यामुळे अनेकदा आम्ही सतत पुढचा लोक काय असेल याविषयी गप्पा मारत असतो. यावेळी मात्र आम्ही खरोखरच कूल लुक यावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यावेळी विराटच्या भुवईत एक छोटीशी खाच ठेवली आहे आणि दोन्ही बाजूला फेडेड हेअर कट आहे. त्याचबरोबर आम्ही केसांना थोडा रंगही दिलेला आहे. जेव्हा मी हे छायाचित्र इंटरनेटवर पोस्ट केले तेव्हा तेव्हा त्याला भरपूर शेअर आणि लाईक मिळाले.
हकीम म्हणतात, “कोहलीचे फॅशनच्या दुनियेत खूप चाहते आहेत आणि फॉलोअर्सही आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोहलीच्या स्टाईलमध्ये सौंदर्यदृष्टी आणि वैशिष्ट्यपूर्णता असते.”





