Nagar | ही निवडणूक अहिल्यानगरच्या भविष्याची: आ. जगताप

नगर, (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहराच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आज शहराच्या प्रत्येक भागांमध्ये कोट्यवधींची विकास कामे पूर्णत्वास येत आहेत. भविष्यात आपले नगर शहर एक विकसित शहर म्हणून उदयास येणार आहे.
ही विधानसभा निवडणूक माझी नसून अहिल्यानगर शहराच्या भविष्याची निवडणूक आहे, याचा आता विचार करा व पुन्हा संधी द्या असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शहरातील नाभिक समाजासाठी जीवाजी महाले चौक नामकरण, सारसनगर येथे खान्देश युवा मंचसाठी नऊ गुंठे जागा, जिल्हा नाभिक समाज ट्रस्टसाठी तपोवन रोड येथे पाच गुंठे जागा, संत सेना महाराज मार्ग नामकरण, अशा विविध प्रकारे केलेल्या कामाचा आढावा आ.जगताप यांनी भाषणातून घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आ. जगताप यांच्या प्रचारार्थ जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनच्या वतीने शहरातील नाभिक समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.जगताप यांनी समाजातील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, उपाध्यक्ष सुनील वाघमारे, राज्य संघटक विकास मदने, शहाजी कदम, सलून असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, जीवन सोनीस,
ज्ञानेश्वर निकम, शेख सत्तार, रहमत शेख, नसीर, नंदकुमार अहिरे, सुनील जाधव, शरद दळवी, अमित वाघमारे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अविनाश घुले आदींसह मोठ्या संख्यने नाभिक समाजातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी संग्राम जगताप यांना पुन्हा आमदार करण्यासाठी सर्व नाभिक समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.
यामध्ये सलून चालक मालक असोसिएशन, खान्देश युवा मंच, सलमानिया जमात, तेलगू नाव्ही संघटना आदींचा पदाधिकारी उपस्थित होते.





