‘मी उपरा नाही..ऊसतोड कामगाराचा मुलगा विरूद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी’

Updated On:

Solapur Lok Sabha Election 2024 ।  सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात स्वागत केले.

राम सातपुते यांना सोलापूरमधून भाजपची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झालेत. सातपुते यांच्या विरोधात पोस्ट देखील केल्या जातायेत. ज्यात ‘चला लागा कामाला, बीडचा पार्सल बीडला परत पाठवूया’ अशा पोस्टकरण्यात येतायेत.  त्यामुळे सोलापुरच्या निवडणुकीत ‘भूमिपुत्र विरुद्ध उपरे’ असा थेट प्रचाराचा मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, याला राम सातपुते यांनी माध्यमांशी बोलतांना सडेतोड उत्तर दिल आहे. माझ्या आई वडिलांनी सोलापुरात ऊसतोड काम केले आहे. मी एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. ही लढाई ऊसतोड कामगाराचा मुलगा विरूद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी’ अशी होणार आहे. असं म्हणत राम सातपुतेंनी शिंदे यांच्या टीकेवर प्रतिउत्तर दिल आहे.

पहा राम सातपुते यांचा व्हिडिओ 

हे वाचलं का ? मला सोलापूरात शिक्षण, जॉब मिळेना, गाव सोडून जावं लागतं…? कु. प्रणितीताई  शिंदे, सातपुतेंना बेरोजगार युवकाने विचारला जाब

आणखी संबंधित बातम्या

जळगावात शरद पवारांना मोठा हादरा...! दोन माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर; कधी होणार पक्ष प्रवेश?

2025-04-29 10:34:15

जळगावात शरद पवारांना मोठा हादरा...! दोन माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर; कधी होणार पक्ष प्रवेश?

"लोकसभेनंतर आमच्यात मुख्यमंत्रिपदासाठी वाद, एकमेकांवर कुरघोड्या..." ; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ

2025-01-10 10:24:10

"लोकसभेनंतर आमच्यात मुख्यमंत्रिपदासाठी वाद, एकमेकांवर कुरघोड्या..." ; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ

"सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता" ; पक्षात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट

2024-10-07 13:48:54

"सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता" ; पक्षात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट

"लोकसभेच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री गडकरींशी बोलायचे" ; विकास ठाकरेंच्या दाव्याने खळबळ

2024-10-07 08:58:19

"लोकसभेच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री गडकरींशी बोलायचे" ; विकास ठाकरेंच्या दाव्याने खळबळ

"रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार दिला ही चूक" ; शरद पवार गटाच्या 'या' नेत्याने दिली कबुली

2024-08-18 12:39:29

"रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार दिला ही चूक" ; शरद पवार गटाच्या 'या' नेत्याने दिली कबुली