“इस बार शंकर को कैसे रोकोगे..?’; ‘रांझणा 2’चा दमदार टिझर प्रदर्शित; अभिनेता धनुष म्हणाला….

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय दिग्दर्शित ‘रांझणा’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. हा चित्रपट 21 जून 2013 रोजी रिलीज झाला होता, ज्यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दिसले होते. या चित्रपटाने सर्वांची मनं जिंकली होती. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने निर्मात्यांनी या चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा केली आहे.
‘रांझणा’ला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, निर्मात्यांनी ‘तेरे इश्क में..’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्याचे दिग्दर्शन आनंद एल. राय करत आहेत आणि धनुष मुख्य भूमिकेत असतील. या संदर्भातील एक अधिकृत व्हिडिओ देखील रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये रांझणा चित्रपटाची कथा पुढे सरकणार असल्याचे दिसून येते.
Dive into the emotional journey of Raanjhanaa as you witness the intense performances, the captivating dialogues, and the unforgettable chemistry that made the film a love story for the ages ❤️ 2 days to go for #10YearsOfRaanjhanaa ✨ pic.twitter.com/Vx6YxU1S7g
— Aanand L Rai (@aanandlrai) June 19, 2023
दरम्यान, रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये धनुषची धमाकेदार स्टाइल दिसत आहे. हातात काचेची बाटली घेऊन तो धावत आहे. बाटलीत आग जळत आहे. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसतो. बॅकग्राउंडमध्ये ‘तेरे हाथ की मेहंदी मेरे आपके छोटे की उधरी है’, असा आवाज ऐकू येतो,
Har har Mahadev 🙏🙏 My next Hindi film. https://t.co/mQeUXyi3dh pic.twitter.com/Abi7ajgaFx
— Dhanush (@dhanushkraja) June 21, 2023
धावत असताना तो पुढे जातो आणि हातातली काचेची बाटली एका भिंतीवर फेकतो, त्यानंतर स्फोट होतो आणि लिहिलं होतं की रांजनाच्या दुनियेतून. इथे धनुषची ओळ आहे, “मागील वेळी कुंदन होता, मान्य, पण यावेळी शंकरला कसे थांबवणार..” असं चित्रपटाच्या टिझर मध्ये दिसून येत आहे.
अभिनेता अधनुषने त्याच्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून हा टिझर शेअर केला आहे. दरम्यान, या चित्रपटातील संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे, तर चित्रपटाची कथा हिमांशू शर्मा यांनी लिहिली आहे.





