Sushmita Mukherjee : कुटुंब सोडून मुंबईत एकटीच राहते ही अभिनेत्री; स्वतः सांगितलं कारण म्हणाली “एकटं राहणं…”
Sushmita Mukherjee : मात्र, त्या कुटुंबापासून दुरावल्या नसून हा निर्णय त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Sushmita Mukherjee : नव्वदच्या दशकात आपल्या विनोदी अभिनयाने आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी (Sushmita Mukherjee ) यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
‘गोलमाल’, किंग अंकल आणि 1920 लंडन यांसारख्या चित्रपटांमधील कमी वेळात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सुष्मिता सध्या 61 वर्षांच्या असून मुंबईत त्या एकट्या राहतात. मात्र, त्या कुटुंबापासून दुरावल्या नसून हा निर्णय त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत सुष्मिता म्हणाल्या, “मी काही दुःखी, एकटी पडलेली किंवा कुटुंबाने दूर केलेली महिला नाही. मी सहसा माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाही, पण काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे.” (Sushmita Mukherjee)
हेही वाचा : Monsoon Update: मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; तारीख समोर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
सुष्मिता यांनी सांगितले की, आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवल्यानंतर त्यांची भेट अभिनेते व निर्माते राजा बुंदेला यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी संसार थाटला आणि कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं. आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन करताना तसेच दोन्ही कुटुंबांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी नेहमीच कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलं.
पती किंवा मुलांशी कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी सांगितलं की, त्यांची दोन्ही मुलं करिअर आणि व्यवसायामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थायिक झाली आहेत. तर त्यांचे पती सध्या उत्तर प्रदेशातील झाशी येथे राहतात. कामाच्या गरजेनुसार ते मुंबईत येतात. (Sushmita Mukherjee)
“एकटं राहणं हा माझा निवडलेला जीवनमार्ग आहे. मी स्वतंत्र आयुष्य जगायला शिकले आहे,” असं सांगत सुष्मिता यांनी त्यांच्या एकटं राहण्यामागील कारण सांगितलं.
1978 मध्ये झालं होतं पहिलं लग्न पण… (Sushmita Mukherjee )
सुष्मिता मुखर्जी यांना अनेक चित्रपटांत मुख्य पात्रांशिवाय सहाय्यक कलाकारांच्या भूमिका जास्त मिळाल्या आहेत. त्या त्यांनी मोठ्या बखुबीने निभावल्या असल्याचे दिसते. राजा बुंदेला यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी त्यांनी चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्यासोबत 1978 मध्ये लग्न केले, पण 22 वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी राजा बुंदेला यांच्यासोबत संसार थाटला. पती आणि दोन मुले असा सुखी परिवार असतानाही सुष्मिता या वयात मुंबईत एका मोठ्या घरात एकट्याच राहतात.





