Bol Bol Rani Teaser : मराठी चित्रपटात सस्पेन्सचा नवा प्रयोग! ‘बोल बोल राणी’चा जबदस्त टीझर भेटीला, सईच्या लूकची चर्चा
Bol Bol Rani Teaser : नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

Bol Bol Rani Teaser : मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना आता आणखी एक रहस्यमय आणि थरारक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट 10 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. (Bol Bol Rani Teaser)
या चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे तब्बल 15 वर्षांनंतर सई ताम्हणकर, सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. (Bol Bol Rani Teaser)
हेही वाचा : Alia-Sharvari Photos: ‘अल्फा’च्या दोन अभिनेत्री एका फ्रेममध्ये; आलिया-शर्वरीच्या ट्विनिंगने वेधलं लक्ष
‘बोल बोल राणी’ हा केवळ सस्पेन्सपट नसून एका महिलेभोवती फिरणाऱ्या गूढ रहस्याचा थरारक प्रवास आहे. रहस्य, थ्रिल आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार असल्याची झलक टीझरमधून पाहायला मिळते. विशेषतः सई ताम्हणकरचे विविध लूक आणि तिच्या पात्राभोवतीचे गूढ वातावरण लक्ष वेधून घेत आहे.
चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, “थ्रिलर म्हणजे केवळ भीती निर्माण करणं नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणं. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक आवाजामागे एक वेगळा अर्थ दडलेला आहे. प्रेक्षकांनी एका वेगळ्या थरारक अनुभवासाठी सज्ज राहावं.” (Bol Bol Rani Teaser)
अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘बोल बोल राणी’ 10 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Bol Bol Rani Teaser)
दरम्यान, सध्या बॅाक्स अॅाफिसवर सई ताम्हणकराचा तुंबाडची मंजुळा हा चित्रपट धूमाकुळ घालत असून, 5 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल 11 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपटात सईने साकारलेल्या पात्राचे विशेष कौतुक होत आहे. (Bol Bol Rani Teaser)
हेही वाचा : Sanchita Ugale : 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होती संचिता; पोलिसांच्या हाती लागले ते महत्त्वाचे चॅट्स





