Vineet Kumar Singh : छावामधील हा अभिनेता झाला बाबा! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून शुभेच्छा

Vineet Kumar Singh : छावा चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घालत मोठी कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील पात्रही प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटातील अभिनेता विनीत कुमार सिंह याने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत मुलाचा जन्म झाला असल्याची बातमी दिली आहे. यामुळे चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अभिनेता विनीत कुमार सिंह आणि त्याचे पत्नी रुचिरा सिंह यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. या जोडप्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्यानी ही आनंदाची बातमी त्याच्या इन्स्टावरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘मुलगा झाला हो! आमचा छोटा तारा आला आहे’ असे म्हटले आहे. त्यांच्या बाळाचा जन्म 24 जुलै रोजी झाला आहे. मात्र, बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
छावा चित्रपटात अभिनेता विनीत कुमार सिंह याने कलशची भूमिका साकारली होती. या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. याशिवाय त्याने ‘सुपरबॉइज ऑफ मालेगाव’, ‘गुंजन सक्सेना’, ‘गोल्ड’, ‘सांड की आँख’ या चित्रपटातही भूमिका साकारलेल्या आहेत. अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मे 2025 मध्ये या जोडप्याने आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी त्याने मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती.





