इंग्लंडमधून आलेले 13 जण करोनाबाधित आढळल्याने खळबळ
Updated On:

अहमदाबाद – करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वाढल्याने इंग्लंडचा विमान प्रवास तात्पुरता बंद केल्याच्या दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये तेथून आलेले पाच प्रवासी करोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर दिल्लीत सहा आणि कोलकात्यात दोन प्रवासी करोना बाधित होते.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता लंडनहून येणारी अखेरचे विमान आले. एका ब्रिटिश नागरिकासह सर्व पाचही प्रवाशांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील कोणाला करोनाच्या नव्या विषाणूची बाधा झाली आहे का? याची माहिती तातडीने मिळू शकली नाही.
विमानातून उतरलेल्या सर्व 270 प्रवाशांची करोना चाचणी घेण्यात आली. याशिवाय कोलकात्यात दोन तर दिल्लीत आलेले सहा प्रवासी करोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. त्या सर्वांची करोनाच्या नव्या विषाणूची बाधा झाली आहे का? याची तपासणी करण्यात येत आहे.





