मुंबई – मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. नारायण राणे यांना 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, नोटीसला देखील 15 दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे.
जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई महापालिकेने दिलेल्या दुसऱ्या नोटीसला नारायण राणे यांच्याकडून देण्यात आलेले उत्तर न पटल्याने तिसरी नोटीस देण्यात आली आहे. यामुळे नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.