Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेने घेतलेल्या एका कथित निर्णयामुळे मोठा वाद पेटला आहे. मुंबईतील काही मासळी बाजारांमध्ये मासे कापून विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पालिकेच्या या अजब निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करत टीका करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्सवरुन ट्वीट करत सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहावर अन्याय केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय? मुंबईतील काही मासळी बाजारांमध्ये महानगरपालिकेने मासे विक्रेत्यांना विशेषतः कोळी महिलांना मासे कापण्यास मनाई केली आहे. कोळी महिलांनी ग्राहकांना अख्खे (न कापलेले) मासे विकावेत. जर मासे कापले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. हा निर्णय अस्वच्छता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या निर्णायावर ठाकरे गटाचे अखिलेश चित्रे यांनी एक्सवरुन ट्वीट करत टीका केली आहे. “कोळ्यांनी मासळी बाजारात मासे कापून विकू नये” असा निर्णय भाजपा-शिंदे गटाकडून घेतला जातो. का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईच्या खऱ्या मूळ रहिवासी म्हणजे आमच्या कोळीबांधवांच्या उदरनिर्वाहावर अशाप्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी बांधव मुंबईत मासे विकणार… तुमच्या नाकावर टिच्चून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आलेत त्याच पद्धतीने विकणार… मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करुन दाखवावीच. आम्हीही पाहून घेऊ कि मुंबईच्या खऱ्या मानकरींना कोण डिवचतं ते. असा थेट इशाराच चित्रे यांनी ट्वीटमधून दिला आहे. “कोळ्यांनी मासळी बाजारात मासे कापून विकू नये” असा निर्णय भाजपा-शिंदे गटाकडून घेतला जातो. का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईच्या खऱ्या मूळ रहिवासी म्हणजे आमच्या कोळीबांधवांच्या उदरनिर्वाहावर अशाप्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी… pic.twitter.com/WbEZ6H0hn4 — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) May 7, 2026 पुढे ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आणि एक गोष्ट स्पष्ट करा… मग chicken घेताना पूर्ण जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का? mutton घेताना जिवंत बकरा घेऊन जायचा का? की नियम आणि “अस्वच्छता” फक्त मासळी बाजारासाठीच का? असे सवाल उपस्थित केले आहेत. भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांनो, तुमचे मनसुबे आम्ही ओळखून आहोत. तुमचं लक्ष्य आता कोळीबांधवांना त्रास देण्याचं आहे. कारण कोळीवाड्याच्या जमिनीवर तुमच्या मालकाचा डोळा आहे, मालकापाशी तुमची लाचारी सिद्ध करायला तुम्ही असेच निर्णय घेणार, असे देखील अखिल चित्रे यांनी म्हटले आहे. आता या टीकेला भाजप आणि शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Hindi Language Exam : मनसेचा विरोध अन् अखेर सरकारी कर्मचाऱ्यांची हिंदी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय