Pimpri-Chinchwad: तिसरा-चौथा रेल्वे ट्रॅक कागदावरच; अनेकदा सर्वेक्षण
Pimpri-Chinchwad: नागरिकांना एक दशकापासून प्रतीक्षा

पिंपरी – औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज हजारो नागरिक नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त पुणे, मुंबई, लोणावळा तसेच आसपासच्या भागांत ये-जा करतात. या प्रवासासाठी लोकल रेल्वे हा जलद आणि सोयीचा पर्याय ठरत आहे.
रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे बसने प्रवास करताना लागणारा वेळ आणि लोकलने कमी वेळात गाठता येणारे अंतर यामुळे रेल्वे प्रवासाला नागरिकांची पसंती मिळत आहे.
पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील वाढता प्रवासी भार आणि मर्यादित रेल्वे मार्गिकांमुळे या व्यवस्थेवर ताण येत आहे. मात्र, तिसरा आणि चौथा रेल्वे ट्रॅकबाबत ठोस काहीच होत नसल्याने हा मार्ग फक्त कागदावरच आहे.
पुणे-लोणावळा मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचा विषय नवीन नाही. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) जून २०१६ मध्ये या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला होता. त्यामध्ये मार्गिकांची आखणी, स्थानकांवरील बदल, पूल, जमीन संपादन आणि उपनगरी रेल्वे सेवा वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा विचार करण्यात आला होता.
प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्याचाही उल्लेख या अहवालात आहे. मात्र, प्रकल्पाचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील अंतर अद्याप प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे.
प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवरील मंजुरी, निधीची तरतूद, जमीन संपादन आणि रेल्वे मंत्रालयाची अंतिम मान्यता याबाबतची सद्यस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ आराखडे आणि घोषणांपुरता हा प्रकल्प मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे ते लोणावळा या ६३.८४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर सध्या दोन मार्गिका आहेत. या मार्गावरून लोकलसह लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस आणि मालगाड्यांचीही वाहतूक होते. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवणे, रेल्वे वाहतुकीचे नियोजन करणे आणि प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी अतिरिक्त मार्गिकांची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, देहूरोड आणि इतर स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी याची आवश्यकता आहे.
प्रवाशांना दिलासा कधी ?
पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या औद्योगिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ, वेळेचे योग्य नियोजन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीसाठी अतिरिक्त क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने तिसरी आणि चौथी मार्गिका उपयुक्त ठरू शकते. मात्र, या प्रकल्पामुळे किती अतिरिक्त फेऱ्या सुरू होतील किंवा प्रवासाच्या वेळेत किती फरक पडेल, हे प्रत्यक्ष रेल्वे नियोजनावर अवलंबून असेल.
चिंचवड जंक्शनवर थांबा मिळावा, अशी मागणी करता येणाऱ्या गाड्या
गाडी – प्रवाशांच्या द्रुष्टीने महत्व
कोयना एक्स्प्रेस – मुंबई–सातारा–सांगली–कोल्हापूर प्रवास
सिंहगड एक्स्प्रेस – पुणे–मुंबई दैनंदिन प्रवास
पनवेल–नांदेड – एक्स्प्रेस मराठवाडा आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी
जोधपूर एक्स्प्रेस – उत्तर भारताशी रेल्वे संपर्क
लातूर एक्स्प्रेस – मराठवाडा आणि मुंबईकडे प्रवास
दक्षिण भारत एक्स्प्रेस – दक्षिण भारताशी संपर्क
गुजरात एक्स्प्रेस – गुजरातकडे प्रवास
तिरुपती एक्स्प्रेस – धार्मिक आणि आंतरराज्य प्रवास
कोल्हापूर–अजमेर एक्स्प्रेस – राजस्थान व पश्चिम
Donald Trump : इराणचे युद्ध लवकरच समाप्त होईल.! डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती





