यवत – बोरगाव जिल्हा सातारा येथे सुमारे 25 लाखांचा दरोडा टाकून मुद्देमाल घेऊन पळून जाणारे आरोपींना यवत पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कासुर्डी ता.दौंड टोलनाका येथे जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
अधिकची माहिती अशी की, सातारा येथील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत सासरणी कुरियर पार्सलच्या गाडीवर दरोडे टाकून समर पंचवीस लाखांचा यवत चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादी हे सोने-चांदी दागिन्याचे कुरिअर पार्सल घेऊन पुण्याकडे जात असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ या ठिकाणी फिर्यादींच्या गाडीला चोरट्यांनी इनोव्हा गाडी आडवी करून त्यांचे तोंडावर स्प्रे मारून एकदम फिल्मी स्टाईलने हा दरोडा टाकण्यात आला.
यामध्ये सोन्या-चांदीची दागिने दरोडेखोर पुणे सोलापूर हायवे रस्त्याने पळून जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना गोपनीय बातमीदार मार्फत समजले त्यानुसार त्यांनी कासुर्डी ता. दौंड या ठिकाणी नाकाबंदी करत सदर दरोडेखोरांची इनोव्हा गाडी (एम.एच.०६ बी.एम ३७१८) ही कासुर्डी टोलनाका येथून भरधाव वेगाने जात असताना नाकाबंदी साठी असलेल्या यवत पोलिसांनी गाडीला हात करून थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून उसाच्या शेतामध्ये पळून जात असताना सहा आरोपींपैकी चार आरोपींना पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.
सरफराज सलीम नदाफ आणि मारुती लक्ष्मण पिसाळ (दोघेही रा.कुंभाजे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर), सुरज बाजीराव कांबळे, करण सयाजी कांबळे (दोघेही रा. सावर्डे ता.हातकणंगले जि.कोल्हापूर), गौरव सुनील घाडगे (रा.मिनचे ता.हातकणंगले जि. कोल्हापूर) असे आरोपींना अटक केलेल्यांची नावे असून त्यांनी बोरगाव पोलीस स्टेशन सातारा गु.रजि.नं २००/२०२३ भादवी कलम ३९५,३४१,३३६ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून इनोव्हागाडी नं (एम.एच ०६ बी.एम ३७१८) सह १८किलो ५०० ग्रॅम वजनाची चांदी आणि ७९.४५ ग्राम वजनाच्या सोन्याचे दागिने चाकू, छाराचे पिस्तूल,मोबाईल फोन, असा एकूण २४लाख ७२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सपोनि केशव वाबळे, सपोनि स्वप्नील लोखंडे, पाटील, लोहटे,शिंदे, गोसावी,देवकर घाडगे, कांचन, जाधव,मोमीन, घुले, नवले, इंगवले, नारायण जाधव, नूतन जाधव, दामोदर होळकर, पांडुळे, सुपेकर, सागर शिरसागर, तात्याराम करे, टकले समीर भालेराव, धीरज जाधव, कांबळे कारवाई करण्यात आली.