Aishwarya Rai Rani Mukherjee : एकेकाळी मैत्रिणी होत्या पण…; राणी-ऐश्वर्या यांच्यात कशामुळे बिनसलं? ‘तो’ किस्सा चर्चेत
Aishwarya Rai Rani Mukherjee : विविध देशांत स्टेज शो सादर करत होत्या आणि त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचाही सहवास होता. याच काळात त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली.

Aishwarya Rai Rani Mukherjee : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांची एकेकाळी अतूट मैत्री होती. दोघींची जोडी इंडस्ट्रीत चर्चेचा विषय होती. मात्र, पुढे एका चित्रपटामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. पण ही मैत्री नेमकी कशी मोडली त्याला काय कारण होतं, याचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे.
एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने तिच्या खुलासा केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, एका आंतरराष्ट्रीय वर्ल्ड टूरदरम्यान दोघी जवळ आल्या. जवळपास ४५ दिवस त्या एकत्र प्रवास करत होत्या, विविध देशांत स्टेज शो सादर करत होत्या आणि त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचाही सहवास होता. याच काळात त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली.

Aishwarya Rai Rani Mukherjee
ऐश्वर्याने राणीच्या स्वभावाचे कौतुक करत तिला मनमोकळी आणि दिलखुलास व्यक्ती म्हटले होते. तसेच, चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दोन अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, हा समज चुकीचा असल्याचेही तिने स्पष्ट केले होते.
‘जीना इसी का नाम है’ या कार्यक्रमात राणी मुखर्जी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहभागी होऊ शकली नव्हती. यातूनच ऐश्वर्या आणि राणी यांच्यात नात्यात दुरावा निर्माण होण्यास सुरूवात झाली. मात्र, तिने ऐश्वर्यासाठी खास व्हिडिओ संदेश पाठवला होता. त्या संदेशात राणी म्हणाली होती, ऐश, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. आपण नेहमीच मैत्रिणी राहू.” त्यावेळी या भावनिक संदेशाचीही मोठी चर्चा झाली होती.
‘तो’ एक चित्रपट आणि…
मात्र, २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चलते चलते’ या चित्रपटाच्या वेळी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जाते. सुरुवातीला या चित्रपटासाठी शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत ऐश्वर्या रायची निवड झाली होती. नंतर काही कारणांमुळे तिच्या जागी राणी मुखर्जीला संधी मिळाली. या घटनेनंतर दोघींमधील संबंध बिघडल्याच्या चर्चा रंगल्या आणि त्यांची एकेकाळची घट्ट मैत्री हळूहळू संपुष्टात आली. आजही ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांच्या मैत्रीपासून दुराव्यापर्यंतचा हा प्रवास बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिलेल्या किस्स्यांपैकी एक मानला जातो.
हेही वाचा : Satyendra Soni : ‘लापता लेडीज’मधील छोटूसोबत घडला भयंकर प्रकार! व्हिडिओ शेअर करत धसाधसा रडला





