Mr. India Making : सध्याच्या युगात व्हिएफएक्सचा वापर वाढला आहे. त्यामुळे अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. चित्रपट तयार करताना देखील व्हिएफएक्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पण ज्यावेळी हे तंत्रज्ञान नव्हते, त्यावेळी व्हिएफक्सची अनुभुती देण्याचा प्रयत्न काही चित्रपटांनी केला होता. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया. या चित्रपटात ना मोठं तंत्रज्ञान ना इतर मोठे साधने असे असतानाही चित्रपट कसा तयार करण्यात आला. थोडक्यात जाणून घेऊयात मिस्टर इंडियाच्या मेकिंगची गोष्ट…. Mr. India Making चित्रपट क्षेत्रात नवीन प्रयोगाला महत्व आहे. ९० च्या दशकात दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मिस्टर इंडिया (Mr. India) या हिंदीतील सुपरहिरो चित्रपटात प्रयोग केला. चित्रपटाला सुपरहिरो म्हणण्याचं कारण म्हणजे यातील पात्रं. अनिल कपूर यांनी साकारलेला अरुण वर्मा आजही लक्षात आहे. पण सध्याच्या युगात मुलांसाठी काहीही करणारा अरुण वर्मा दिसणं कठीण असो…. Mr. India Movie चित्रपटाच्या मेकिंगच्या अगोदर चित्रपटाची संकल्पना कशी सुचली या गोष्टीपासून सुरुवात करू… मिस्टर इंडिया हा चित्रपट सलीम-जावेद यांची जोडी तयार करणार होती. त्यांनी चित्रपटाच्या कथेवर काम केले होते. पण काही कारणांमुळे ही जोडी तुटली आणि हा चित्रपट जावेद अख्तर यांच्याकडे आला. दरम्यानच्या काळात बँडेट क्वीन, मासूम या चित्रपटांमुळे शेखर कपूर यांचं मोठं नाव झालं होतं. जावेद अख्तर यांनी चित्रपटाची कथा शेखर यांनी ऐकवली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला. त्यानंतर चित्रपटाच्या कथेवर काम सुरू झालं. चित्रपटाच्या कथेचा विचार करताना दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या नावाची मुख्य पात्रासाठी शिफारस केली होती. पण काही कारणामुळे अमिताभ बच्चन ऐवजी अरुण वर्माचे पात्र अनिल कपूर यांना मिळाले आणि त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अरुण वर्माच्या पात्राला पुरेपुर न्याय दिला. याविषयी सांगताना शेखर कपुर म्हणतात, सलीम-जावेद ही जोडी वेगळी झाल्यानंतर मिस्टर इंडिया जावेद अख्तर यांच्याकडे गेला. त्यांनी माझा मासूम चित्रपट पाहिला होता. त्यांना वाटलं की हा लहान मुलांसोबत चांगलं काम करतो. म्हणून त्यांनी माझ्या नावाचा विचार केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कथेवर नेमकेपणाने काम करण्यास सुरुवात झाली. हेही वाचा : Khamenei Is Back: “थरथरणाऱ्या हातात काठी, बोटात अंगठी…” ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यात भीती दाखवणारा व्हिडीओ इराणी मीडियाकडून शेअर १२ वर्षांच्या मुलगा सोबत होता. Mr. India Making या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी एक १२ वर्षांचा मुलगा शेखर कपूर सीन शूट करताना त्यांच्याजवळ बसलेला असायचा. सीन शूट झाल्यानंतर ते त्याला सीन कसा झाला असे विचारायचे आणि तो त्यांना म्हणायचा बोरिंग…. चित्रपटातील काही पात्रांना अतरंगी नावं देण्यात आली आहेत. अमिरिश पुरी यांचे पात्र मोगैंबो, सतिश कौशुक यांचं पात्र कलेंडर. महत्वाचे म्हणजे मोगैंबो खुश हुआ हा डॅायलॅाग अजरामर झाला. चित्रपटात कॅलेंडरचा वावर प्रभावित करणारा ठरला. चित्रपटात या पात्रांची वेषभूशा बदलली गेली नाही. ती तशीच कायम ठेवण्यात आली. कारण ती पात्राची गरज असल्याचे शेखर कपूर यांनी सांगितले. Mr. India Making हे करण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्यावर मार्व्हरलच्या पात्रांचा प्रभाग होता. त्याचा वापर त्यांनी चित्रपटात केला. तसेच चित्रपट तयार करण्याची प्रोसेस खूपच आनंददायी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोगैंबो खुश हुआ हा डॅायलॅाग हिट झाल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात गेलं तरी लोक मला हा डॅायलॅाग म्हणायला सांगायचे असे अमिरीश पुरी शेखर यांना म्हणत. ते असेही गंमतीने म्हणत या पात्राशिवाय मी आणखी पात्र साकारली नाहीत का अशी आठवण शेखर कपूर यांनी काढली. Mr. India Making या चित्रपटातील अनिल कपूर यांचं पात्र हातावरच्या वस्तूवरचं बटन दाबल्यानंतर गायब होत असायचं. ते कसं दाखवण्यात आलं याबद्दल सांगताना शेखर कपूर म्हणाले, त्यावेळी तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. तसे हे दाखवणं कठीण होतं, पण आम्ही धाडस केलं. मास्किंगचा वापर आम्ही केला. एका सीनबद्दल सांगताना शेखर म्हणाले, चित्रपटातील एक सीन आहे, ज्यावेळी श्रीदेवी बॅासच्या केबिनमध्ये बसलेली आहे. अचानक केबिनमध्ये अरुण वर्माची एन्ट्री होती. तो दिसत नाही. खुर्चीवर बसल्यानंतर टेबलवर असणारी कोकोकोलाची बॅाटल हवेत उचलली जाते, त्यानंतर त्यातील लिक्वड बाहेर स्ट्रोने ओढले जाते. हे दाखविण्यासाठी ही बॅाटल आरशाला चिटकवली आहे. ते तुम्हाला दिसत नाही. लीक्वड ओढून दुसऱ्या बाजूला शिफ्ट होते. ते नेमके कसे साकारले याबद्दल त्यांनी अधिक सांगितले नाही. ही संपूर्ण माहिती दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमधून घेण्यात आलेली आहे. हेही वाचा : Schizophrenia: वेळीच ओळखा स्किझोफ्रेनिया; योग्य उपचारांनी मानसिक आजारावर मात शक्य