‘हे’ आहेत भारतातील सर्वाधिक विक्री होणारे ‘टॉप 5’ स्मार्टफोन

नवी दिल्ली – सध्या मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग बनलेला आहे. त्याच अँड्रॉइड आल्यापासून तर स्मार्टफोन जगतामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. भारतामध्ये तर स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या कितींमध्ये आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या हातात दरमहिन्याला नवीन स्मार्टफोन दिसून येतो. आज आपण भारतात मधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘टॉप 5’ स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊया.
हे आहेत सर्वाधिक विक्री होणारे ‘टॉप 5’ स्मार्टफोन –
1. Redmi Note 7 Pro – या यादीत पहिल्या क्रमांकावर Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोन असून, याची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. बाजारात 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात हा फोन उपलब्ध आहे.
2. Realme C2 – हा स्मार्टफोन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. हा फोन 2 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे.
3. Redmi Note 7S – या यादीत तिसऱ्या क्रमांकावर Redmi Note 7S या फोनचा नंबर लागतो. हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात उपलब्ध असून, या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये इतकी आहे.
4. Realme 3 – 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात उपलब्ध असणारा Realme 3 हा फोन चौथ्या क्रमांकावर आहे. या स्मार्टफोनची किंमत 8.129 रुपये इतकी आहे.
5. Redmi 7A – हा स्मार्टफोन या यादीत पाचव्या क्रमांकावर येतो. या स्मार्टफोनची किंमत 5,799 रुपये इतकी असून, 2 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज मध्ये हा फोन बाजारात उपलबध आहे.










