भारतात ‘या’ ९ जातींच्या श्वानांवर आहे बंदी ; यातील एकाने तर वृद्ध महिलेला केलं ठार

परदेशी जातींचे संगोपन करण्याचा कल देशात खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत जगात अनेक ठिकाणी बंदी असलेल्या जाती देशात विकल्या जात आहेत. असे पाळीव श्वान तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत, घरासाठी श्वानांची निवड करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. अनेकवेळा आपण श्वान विकत घेतो. अशा परिस्थितीत श्वानांच्या परिस्थितीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा पाळीव प्राणी वाईट परिस्थितीतून गेलेले असतात. त्यामुळे अशावेळी आपण जागरूक असायला हवे. त्यामुळेच श्वानांनी माणसांवर हल्ले करण्याच्या वाढत्या घटनांमुळे भारत सरकारने श्वानांच्या अतिशय धोकादायक अशा नऊ जातील वर बंदी घातलेली आहे.
रॉटवेलर – रॉटवेलर ही जात निष्ठावान असते, तसेच मालकाचे आणि त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र रॉटवेलर जातीच्या कुत्र्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले नाही तर ते धोकादायक ठरतात.
पिटबुल टेरियर – या जातीचे कुत्रे त्यांचा आकार आणि क्षमता यामुळे ओळखले जातात. जेव्हा या जातीची कुत्री आक्रमक होतात तेव्हा ती अतिशय धोकादायक असतात.
मास्टिफ्स – या जातीचे कुत्रे आकाराने अवाढव्य असतात आणि अनेकदा आक्रमक देखील होतात. त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे गरजेचे असते.
अमेरिकन बुलडॉग – या जातीचे कुत्रे सशक्त असतात. त्यांची ताकद आणि आकार यामुळे ते आक्रमक होण्याची जोखीम जास्त असते.
अकिता – जपानमधील जातीची ही कुत्री देखील आक्रमक असतात. त्यांना जर का योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले नाही तर अन्य प्राणी आणि माणसांवर ते हल्ले करतात.
वुल्फडॉग – ही देशी कुत्र्याची हायब्रीड जात आहे. कुत्रा आणि लांडगा यांच्या संकरातून तयार झालेली ही जात अनेकदा अनाकलनीय वर्तन करते. वुल्फडॉग या जातीची कुत्री अमेरिकेच्या दक्षिण भागात आढळतात. वुल्फडॉग त्यांच्या अनियमित आणि धोकादायक वर्तनासाठी ओळखले जातात. वन्य, पाळीव प्राण्यांशी त्यांचे जवळचे नाते असल्यामुळे ते त्यांच्या वन्य पालकांसारखे हिंसक वर्तन करतात.
नेपोलिटन मस्तिफ्स – या जातीच्या कुत्र्यांची त्वचा ओघळलेली असते. त्यांच्याकडे प्रचंड ताकद असते काही वेळा ते आक्रमक होतात.
फीला ब्रासीलेरिओ – ब्राझिलियन जातीची ही कुत्री आकाराने मोठी असतात आणि ती अतिशय चपळ व वेगवान असतात. त्याखेरीज ती त्यांच्या आक्रमकतेमुळेही ओळखली जातात.
डोगो अर्जंतिनो – या जातीची कुत्री पूर्वी शिकारीच्या खेळासाठी वापरली जात ती अतिशय आक्रमक असतात आणि त्यांचे वर्तन अनेकदा अनाकलनीय असते.
ऱ्होडेशियन रिजबॅक, टेरियर्स, कॅनरियो, अकबॅश, मॉस्को गार्ड, केन कॉर्सो, साऊथ रशियन शेफर्ड डॉग, कॉकेशियन शेफर्ड डॉग, सेंट्रल एशियन शेफर्ड डॉग, कँगल, बोअरबोल या जातीच्या कुत्र्यांच्या जातींवरही भारतात बंदी आहे.





