Ranya Rao Gold Smuggling | कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या राव मोठ्या अडचणीत सापडली आहे. रान्या रावला मार्च महिन्यात सोनं तस्करी प्रकरणात बंगळुरु विमानतळावर अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तिला एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी हा आदेश परकीय चलन संरक्षण आणि तस्करी प्रतिबंध कायदा (COFEPOSA) अंतर्गत सल्लागार मंडळाने जारी केला. यात रान्या रावसह दोन अन्य आरोपींचा समावेश आहे. आदेशानुसार, तिघांनाही एक वर्षाच्या कारावास कालावधीत जामिनासाठी अर्ज करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यापैकी कोणीही संपूर्ण शिक्षा कालावधीत जामिनासाठी अर्ज करू शकणार नाही. तिच्याकडे तब्बल १२ कोटी रुपयांचे सोनं आढळून आल्याने सदर कारवाई करण्यात आली. अभिनेत्री रान्या रावला ही दूबईहून परतत असताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे सोनं आढळून आले. नेमकं प्रकरण काय? ३ मार्च रोजी दुबईहून एमिरेट्सच्या फ्लाइटने बेंगळुरूला आली असता केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) ने रान्या रावला अटक केली होती. तिच्याकडे तब्बल १२ कोटी रुपयांचे सोनं आढळून आले होते. रान्या रावला ही दूबईहून परतत असताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे हे सोनं आढळून आले. पोलीस कॉन्स्टेबल तिला विमानतळातून बाहेर पडण्यासाठी मदत करायचा. तर जतीन हुक्केरी हा रान्याचा पती आहे. तो आर्किटेक्ट असून त्याचं किंवा त्याच्याशी संबंधित कुणाचंही काम दुबईत सुरु नाही अशीही माहिती पोलिसांना मिळाली ज्यामुळे रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय पोलिसांना आला. तसंच फेब्रुवारी-मार्च महिन्यात ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे रान्या राववर पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. Ranya Rao Gold Smuggling | कोण आहे रान्या राव? ३३ वर्षीय रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रान्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर या गावात झाला. तिने प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षण बंगळुरूमधून पूर्ण केलं. रान्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं. २०१४ मध्ये रान्या रावने ‘मानिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीपबरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. रान्या यांचे सावत्र वडील रामचंद्र राव हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहे. ३४ कोटींची मालमत्त जप्त ४ जुलै रोजी ईडीने रान्या विरुद्ध कारवाई करताना बेंगळुरूच्या विक्टोरिया लेआउटमधील एक घर, बेंगळुरूच्या अर्कावती लेआउटमधील एक भूखंड, तुमकूरमधील एक औद्योगिक जमीन आणि अनेकल तालुक्यातील शेतीची जमीन जप्त केली होती. या सर्व मालमत्तांची एकूण किंमत सुमारे ३४.१२ कोटी रुपये आहे. Ranya Rao Gold Smuggling | हेही वाचा : “पहलगाम हल्ल्याचा बदला घ्या, त्या चौघांना…” ; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ओवेसींचे सरकारला मोठे आवाहन