पुणे | जीवनावश्यक वस्तूंना अपेक्षित मागणी नाही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आवक कमी झाल्यामुळे हरभरा, हरभरा डाळ, भाजके डाळे, बेसनच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मिलबर गव्हाचे भाव वाढल्यामुळे आटा, रवा आणि मैद्याच्या दरातही ५० किलोमागे १५ ते ५० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, गेल्या आठवड्यात मागणी कमी असल्याने साखरेच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी, तर ज्वारीच्या दरात शंभर रुपयांनी घट झाली.
मात्र, श्रावण महिना सुरू झाला असून, या महिन्यातील सणासुदींमुळे जीवनावश्यक वस्तंना मागणी वाढेल, असा अंदाज होता. मात्र, अद्यापही अपेक्षित प्रमाणात मागणी वाढलेली नाही. यामुळे मागणीअभावी साखरेच्या दरात घट झाली, तर खाद्यतेलांचे दर स्थिर होते.
हरभरा डाळीची दरवाढ सुरूच आहे. उत्पादन केंद्रातील तेजी आणि सणासुदींमुळे वाढत असलेली मागणी यामुळे गेल्या आठवड्यातही हरभरा आणि हरभरा डाळीचे दर क्विंटलमागे आणखी २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत.
भाजके डाळे दरात ४० किलोमागे, तर बेसन दर ५० किलोमागे २०० रुपयांनी वाढ झाली. हिरव्या वाटाण्याचा तुटवडा कायम असून दरवाढ सुरूच आहे. मात्र, मागणीअभावी अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते. आटा, रवा आणि मैदा तयार करणाऱ्या फ्लोअर मिलना गव्हाचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.
त्यामुळे खुल्या बाजारातील मिलबर गव्हाचा खप वाढला असून, दरात ५० रुपयांनी वाढ झाली. यामुळे आटा, रवा आणि मैद्याचे दर ५० रुपयांनी वाढले. सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जुन्या साठ्यातील ज्वारीची विक्री वाढली आहे. यामुळे ज्वारी दरात क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी वाढ झाली. गहू, बाजरी, तसेच तांदळाचे दर स्थिर होते.
दरम्यान, साखरेच्या दरात घट, गूळ स्थिर आहे. सणासुदींना प्रारंभ होऊनदेखील अपेक्षित मागणी नसल्यामुळे गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी घट झाली. आवक, जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यात गुळाचे दर टिकून होते. अद्यापही मागणी कमीच असल्याचे सांगण्यात आले.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, पाम, तसेच सूर्यफुल तेलाचे दर स्थिरावले आहेत. आयात मुबलक प्रमाणात होत आहे. मात्र, मागणी नसल्याने शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांच्या दरातील मंदी कायम आहे. श्रावणातील सणांमुळे यापुढे खाद्यतेलांस उठाव राहील, असा अंदाज आहे.
घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे
साखर (प्रतिक्विंटल) ३९०० रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २५५०-२६००, रिफाइंड तेलः २२८०-३०००, सरकी तेल
१४९०-१८००, सोयाबीन तेल १५००-१६५०, पामतेल १३८०-१५००, सूर्यफुल रिफाइंड तेल १४७०-१६००, वनस्पती तूप १४६०-१८५०, खोबरेल तेल २६०० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ४०००-४५००, मसुरी ४०००-४५००, सोना मसुरी ५०००-५५००, एचएमटी कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१) ११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ७०००-८०००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१००००,
बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९) -८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु. गहू – सौराष्ट्र लोकवन नं. १ – ४३००-४५००, सौराष्ट्र लोकवन नं. २ – ३८००-४०००, एम.पी. लोकवन नं. १ – ४२००-४४००, नं. २ – ३७००-४०००, नं. ३ – ३३००-३५००, सिहोर ५६००-६०००, सिहोरी ४३००-४३००, मिलबर ३०००-३०५० रु.
ज्वारी :- गावरान नं. १ ५१००-५४००, गावरान नं. २ ४०००-४४००, नं. ३ ३३००-३४००, दूरी नं. १ ३२००-३३००, दूरी नं. २ ३०००-३१०० रु बाजरी :- महिको ३४००-३८००, गावरान ३२००-३४००, हायब्रीड २८००-३१०० रु. गूळ:- गूळ एक्स्ट्रा ४३०-४४५०, गूळ नं. १ ४३००-४४५०, गूळ नं.२ ३९२५-४०२५ गूळ नं.३ ३८००- ३९००, बिगर रसायन बॉक्स पॅकिंग नं.१ – कऱ्हाड ४७००-५३००, नं. २ – दौंड ४०००-४६००,
डाळी:- तूरडाळ १३०००-१६५००, हरभराडाळ ८९००-९२००, मूगडाळ १०४००-१०७००, मसूरडाळ ७६००- ७७००, मटकीडाळ ९७००-९८००, उडीदडाळ ११०००-१३००० रु.
कडधान्ये:- हरभरा ७८००-८०००, हुलगा – ७५००-७७०० चवळी ९०००-१०००, मसूर ६८००-६९००, मूग ९५००-१००००, मटकी गावरान ७५००-८५००, मटकी पॉलिश ७५००-८०००, मटकी गुजरात ७५००-८०००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम ९८००-१००००, वाटाणा हिरवा १६०००-१७०००, वाटाणा पांढरा ४५००-४६००, काबुली चणा १००००-१३००० रु.
साबुदाणा :– साबुदाणा नं. १ ७०००, साबुदाणा नं.२ ६८००, साबुदाणा नं. ३ ६५०० रु.
वरई भगर :- १००००, सावा भगर ९५००, गोटा खोबरे १०००-१२०० रु.
शेंगदाणा :- जाडा १००००-१०५००, स्पॅनिश – ११२००-१३००० घुंगरू १०२००-१०४००, टीजे ८५००- ८६००
धने :- गावरान ९०००-१००००, इंदूर १२०००-१५००० रु.
पोहे :- मध्य प्रदेश ४३००-४५००, पेण ४४००-४५००, मध्यम पोहा ४२००-४३००, दगडी पोहा ४३००-४८००, पातळ पोहा ४९००-५७००, सुपर पोहा ४८००-५४००, भाजका पोहा ६००-७००, मका पोहा ५७५-६७५, भाजके डाळे ३८००-४२००, मुरमुरा राजनांदगाव (९ किलोस) ५४०, भडंग ८५०-१०००, घोटी ५३०, सुरती ५५० रु. रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा १६७५-१७२५, रवा १७००-१७५०, मैदा १७००-१७५०,
बेसन :- (५० किलोस) ४९००-५२०० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरची:- काश्मिरी ढब्बी ३५०००-३८०००, ब्याडगी २००००-२३०००, लवंगी तेजा २००००-२२०००,
गुंटूर १८०००-२००००, खुडवा गंटूर ८०००-९०००, खुडवा ब्याडगी ९०००-१०००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग १३५०-१४५०, मद्रास २६००-२८००, पालकोल जुना १५००-१५५०, सापसोल २५००-२७०० रु.





