…प्रत्यक्षात एकही फिरते पशुचिकित्सालय नाही!

कबीर बोबडे
तीन तालुक्यात पशुचिकित्सालय मंजूर ; अद्याप एकही सुरू झालेले नाही
नगर – भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शेवटच्या अर्थसंकल्पात कृषी, सिंचन यावर भर दिला. या अर्थसंकल्पात राज्यातील ऐंशी तालुक्यात मुख्यमंत्री पशू स्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुचिकित्सालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, गेल्या पाच महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात झालेली दिसली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा उपक्रम कागदावरच राबवल्या जात असल्याचे दिसते.
पशुधनाला आरोग्य सेवा तातडीने मिळावी, यासाठी राज्यभरातील पशुसंवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागाने 302 तालुक्यात फिरते पशुचिकित्सालय मंजूर करून घेतले. यापैकी पहिल्या टप्यात राज्यातील 80 तालुक्यात फिरते पशुचिकीत्सालय मंजूर करण्यात आले. यामध्ये नगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीगोंदा व कर्जत ह्या 3 तालुक्याची पशुचिकित्सालय सुरू करण्यासाठी निवड झालेली आहे. जिल्ह्यातील पशुंची एकूण आकडेवारी पाहता तीन फिरते पशुचिकित्सालय पुरेशी आहेत का, या अनुत्तणीय प्रश्नावरही विचार व्हावा. या फिरत्या पशुचिकित्सालयासाठी मोबाइल व्हॅन डॉक्टर, परिचारक, औषधे या व्हॅन मध्ये असणार आहेत. ह्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांक असल्याचेही सांगितल्या गेले.
पशु चिकित्सालय मंजूर तालुक्यातील पशुपालकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास पशुधन सेवेसाठी पशुचिकित्सालय तात्काळ पशुपालकांच्यादारी हजर होणार होती. शिवाय पशुचिकित्सालय दिवसाला किमान 50 किलोमीटर फिरून जनावरांवर उपचार केले जाणार होते. मात्र, अद्याप एकही पशुचिकित्सालय जिल्ह्यातील कुठल्याही मंजूर तालुक्यात सुरू झाले नाही.
विधानसभा निवडणुकामुळे या योजनेची प्रत्यक्ष अंमबजावणी करण्यासाठी अडचणी आल्यात, त्यामुळे योजनेची कारवाई रखडल्या गेली असे सांगितले जाते. परंतु, आता निवडणुका संपून एक महिना झाला शिवाय राज्यातील सत्तेचा गोंधळही संपलेला आहे. आधीच्या सरकारवर पशुचिकित्सालय सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाले.





