Bhadra Maruti Temple: पहिल्या श्रावण शनिवारनिमित्त ‘भद्रा मारूती’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी !

Bhadra Maruti Temple – पहिल्या श्रावणी शनिवारी (दि. १०) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर भद्रा मारुती येथे सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी संपूर्ण परिसरात अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्रावणी शनिवारच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास मंदिर परिसरात बेलांच्या पानांची सजावट करून भद्रा मारुतीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला.
यावेळी माजी खासदार व भद्रा मारुती संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत खैरे, अतुल सावे, मिठू बारगळ, रामनाथ बारगळ, किशोर अग्रवाल, पोपट जैन, कचरू बारगळ, भूषण अग्रवाल, खंडेराव बारगळ आणि गावकरी इत्यादी उपस्थित होते.
मध्यरात्री रात्री १२ वाजता वेदमंत्राच्या जयघोषात शंख नाद करून भद्रा मारुतीस अभिषेक घालण्यात आला. पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिर प्रांगण भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.
पहिल्याच शनिवारी सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्व सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस प्रशासन तैनात करण्यात आले होते.





