थकीत ऊस बिल व्याजासह न दिल्यास शासनाला कायद्यानुसार कारवाई करायला लावणार : अभिजीत पोटे ३० जून अखेर पर्यंत थकीत ऊस बिल देण्याचे लेखी पत्र दिले नेवासा – अगस्ती साखर कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील सर्वाधिक नेवासा – श्रीरामपूर तालुक्यातून एक लाख ९० हजार मॅट्रिक टन ऊस तोडला असून पाच महिने होऊन सुद्धा ऊस बिल मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल होवून कर्जबाजारी झालेला आहे. साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम गायकर वारंवार आश्वासन व लेखी पत्रातील तारखा बदलत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्याकडे तक्रार अर्ज करताच पोटे यांनी थेट अगस्ती कारखान्यावर जाऊन कार्यकारी संचालक कापडणीस यांच्याकडून थकीत ऊस बिल व्याजासह कधी मिळणार लेखी पत्र द्या अन्यथा आंदोलन करू व शासनाला कारखान्याला पुढील हंगामाचा गळीत परवाना देण्यापासून रोखू आणि आर आर सी कारवाई करायला लावू यावर कार्यकारी संचालक कापडणीस यांनी विनंती करत ३० जून अखेरपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल देवू असे पोटे यांनी लेखी पत्र दिले यावेळी प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले,बाबासाहेब नायकवाडे, केतन देशमुख व शेतकरीवर्ग उपस्थित होता.