Yuzvendra Chahal : “लाखो भावना आहेत पण….”; EX पत्नी धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलची पहिली प्रतिक्रिया, फोटो शेअर केला अन्…

Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची एक्स पती धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतरच्या पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहल याने एका पॅाडकास्टमध्ये त्याची बाजू मांडली होती.
त्यानंतर त्याची Ex पत्नी अभिनेत्री-नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्माने घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच मौन सोडलं असून तिची बाजू मांडली आहे. ज्या दिवशी घटस्फोट झाला त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? याबाबत दोघांनीही खुलासा केला आहे. ज्यावेळी न्यायालयात निकाल जाहीर करण्यात आला होता, त्यावेळी धनश्रीला आपले अश्रू रोखता आले नाही. ती धसाधसा रडली, असा खुलासा तिने केला आहे.
त्या दिवशी चहलने बी युअर ओन शुगर डॅटी असा मजकूर असलेला टी शर्ट घातला होता. त्याने केलेल्या टी शर्ट स्टटंलाही धनुश्रीने चोख उत्तर दिलं आहे. ‘अरे भाई, तू व्हॉट्सअॅप करू शकला असतास, तू टी-शर्ट का घातलास. गोष्टी मॅच्युरिटीने हाताळल्या पाहिजेत’. असं तिने म्हटलं असल्याचं सांगितलं.
आता तिने केलेल्या या विधानाला घेऊन चाहते तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान, या सगळ्यात युजवेंद्र चहल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये युजवेंद्र हा डोंगरांमध्ये उभा असल्याचं दिसत आहे. या फोटोला त्याने लक्षवेधक कॅप्शन दिलं आहे. ‘लाखो भावना आहेत पण शब्द शून्य आहेत’. असं त्याने म्हटलं आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर धनश्री आणि युजवेंद्र यांच्या नात्यातील आलेल्या दुरावा, घटस्फोट आणि त्यानंतर दोघांनी केलेल्या खुलासाची जोरदार चर्चा होत आहे. यामुळे दोघेही चर्चेत आहेत.
हेही वाचा : भारत-चीन व्यापार करारावर नेपाळचा तिळपापड ; परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली इतिहासाची आठवण





