‘तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत. फक्त केंद्रातच नाहीत’ – संजय राऊत
Updated On:

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले.’चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं. केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत. खासकरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया होत्यात. त्यातही महाराष्ट्रात हे प्रमाण जरा जास्तच आहे.
ते पुढे म्हणाले,’भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत, याची माहिती संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून मी गोळा केली आहे. अशी माहिती मी वारंवार देत जाईन. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल. आमच्या सगळ्यांचे फोन टॅप केलेत. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत. फक्त केंद्रातच नाहीत. असं सांगतानाच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.





