Sonam Wangchuk : “मला संसदेवरील मोर्चात जाऊ द्या”; सोनम वांगचुक यांचे रुग्णालयाला पत्र, बंदी का लादली जातेय?
Sonam Wangchuk : जंतरंतरवर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

Sonam Wangchuk : दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण सुरू होते. मात्र आंदोलनाच्या 21 व्या दिवशी जंतर मंतर येथील आंदोलनस्थाळावरून पोलिसांनी अचानकपणे वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं.
तेथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे सोनम वांगचुक यांनी एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी “मला संसदेकडे मार्च करायचे आहे, कृपया मला डिस्चार्ज द्यावा.” अशी मागणी रुग्णालयाला पत्र लिहून केली आहे. (Sonam Wangchuk)
नेमकं पत्रात काय ? (Sonam Wangchuk)
सोनम वांगचुक यांनी सफदरगंज रुग्णालयात पत्र लिहून रुग्णालयातील प्रशासनाला सांगितलं की, “आज माझी प्रकृती चांगली आहे. मी विनंती करतो, की मला थोड्या वेळासाठी रुग्णालयातून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी आज सकाळी होणाऱ्या संसदेवरील मार्चात सहभागी होऊ शकेन.”
सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात लिहिलेले पत्र अधिकृतरित्या ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. त्यांनी नमूद केले की, सोनम वांगचुक सर्वांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येईल. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले नाही, असा दावा केला जात आहे. तर त्यांची प्रकृती उत्तम असताना रुग्णालयात निर्बंध का घालण्यात आले आहेत,” असा परखड सवालही त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून केला आहे.
Sonam Wangchuk is trying hard to see you all! Just submitted a letter to the hospital as his health is good and they claim he is not in detention. So why the restrictions? pic.twitter.com/XqeurZUtoP
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 20, 2026
‘मामला शिक्षा मंत्री का, बात स्वास्थ्य मंत्री करेंगे’
तर दुसरीकडे CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. त्याच पार्अशवभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने एक ट्विटही केलं आहे. ‘मामला शिक्षा मंत्री का, बात स्वास्थ्य मंत्री करेंगे’ असं CJPचं ट्विटं आहे.
आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
काल रात्रीपासून जंतरमंतर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलक जमण्यास सुरूवात झाली. आज सकाळी 10 वाजता जंतर-मंतर येथे पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या निदर्शकांवर लाठीचार्ज केला. जंतर-मंतर ते संसद भवन या २ किलोमीटरच्या पट्ट्यात केवळ आंदोलकच दिसत होते. या आंदोलनादरम्यान, आंदोलक राजीव चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्थानकांमध्ये घुसले.
अनेकांनी तर बॅरिकेड्स तोडून संसद पोलीस ठाण्यापर्यंत मजल मारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर आता काही आंदोलकांनी संसद भवन गाठले असून, आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांडया फोडण्यात आल्या आहेत. सध्या संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा:





