CJP Protest Delhi: ….म्हणून अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडले ; सोनम सोनम वांगचुक कधी सोडणार उपोषण ? वाचा
CJP Protest Delhi: 'कॉकरोच जनता पार्टी'चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोमवारी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून जंतर मंतर याठिकाणी आपले उपोषण संपवले असल्याची माहिती समोर येत आहे.

CJP Protest Delhi: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोमवारी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून जंतर मंतर याठिकाणी आपले उपोषण संपवले असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दीपके यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले होते. (CJP Protest Delhi)
मंचावरून या निर्णयाची घोषणा करताना गीतांजली आंगमो म्हणाल्या की, “वांगचुक यांनी दीपके यांना उपोषण संपवून आंदोलन सुरू ठेवण्यासाठी आपली ऊर्जा वाचवण्याची विनंती केली होती. त्यानंतर दीपके यांनी ज्यूस पिऊन आपले उपोषण संपवले”. त्यांच्या सोबतच्या आंदोलन कर्त्यांनी देखील त्यांचे उपोषण सोडले आहे. दरम्यान, वांगचुक अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. (CJP Protest Delhi)
निषेधाच्या ठिकाणी प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे आणि निषेध स्थळाकडे जाणाऱ्या मार्गांपैकी एक मार्ग रोखण्यासाठी मागील (केरळ हाऊसजवळ) बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. टॉलस्टॉय मार्गावर बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत. सध्या लोकांच्या ये-जा करण्यासाठी एक छोटासा मार्ग उरला आहे. पोलीस सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. (CJP Protest Delhi)
The struggle continues in new forms as the 23 day hunger strike ends
The movement achieves a leap forward in uniting the entire opposition and bringing the nation onto the streets
We will continue this fight together pic.twitter.com/pQzVaGekkr
— Neha (@neha_aisa) July 20, 2026
सोनम वांगचुकचे उपोषण संपवण्याच्या अटी (CJP Protest Delhi)
सफदरजंग हॉस्पिटलमधून लिहिलेल्या चिठ्ठीत सोनम वांगचुक यांनी तीन अटी नमूद केल्या आहेत ज्यात ते आपले उपोषण सोडणार आहेत. वांगचुकने लिहिले, “प्रिय मित्रांनो आणि समर्थकांनो, तुमच्यापैकी अनेकांनी मी माझे उपोषण कधी संपवणार हे विचारले आहे. (CJP Protest Delhi)
मी माझ्या समर्थकांना आधी सांगितल्याप्रमाणे, मी 20 जुलैला माझे उपोषण तेव्हाच संपवणार आहे जेव्हा सरकारने पेपर लीक इत्यादीसारख्या शैक्षणिक व्यवस्थेतील अलीकडील अपयशाची जबाबदारी घेतली किंवा CJP चे नेतृत्व संसदेत पोहोचले, जिथे सन्माननीय खासदार आणि विविध पक्षांचे नेते आम्हाला आश्वासन देतात की ते आता संसदेत हा मुद्दा मांडतील.” त्यांची तब्येत परवानगी देत नसेल तर खासदार रुग्णालयात येऊन आश्वासन देऊ शकतात, असे ते म्हणाले.





