“…तर मंत्र्यांचे पुन्हा रस्त्यावर फिरणे बंद करेन”; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांनी म्हणाले की, “कोणी कितीही काहीही केले तरीही मी माझ्या गरिबांना आरक्षण देणार आणि हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेले आहे. ओबीसींसाठी उपसमिती तयार केली चांगले आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मी सक्षम आहे. कोणी कितीही उपसमित्या बनवल्या तरीही आम्हाला आरक्षण मिळणारच आहे.” Manoj Jarange |
‘पुन्हा रस्त्यावर फिरणे बंद करेल’
पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा गॅझेटिअरबाबत देखील सरकारने हयगय करता कामा नये, जर हे झाले नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणे बंद करेल, असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. त्यांनी ओबीसींसाठी उपसमितीचे समर्थन करत दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासी आणि मायक्रो ओबीसींसाठीही उपसमित्या करण्याची मागणी केली. Manoj Jarange |
अभ्यासक आंदोलनाच्या वेळी कुठे असतात?
यावेळी मनोज जरांगे यांनी संभ्रम निर्माण करण्याऱ्या अभ्यासकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “मुंबईतील काही अभ्यासक जीआरमध्ये बदल होण्याचा संभ्रम निर्माण करत आहेत. हे अभ्यासक आंदोलनाच्या वेळी कुठे असतात? असा सवा त्यांनी यावेळी केला.
भुजबळांबद्दल बोलताना जरांगे यांनी म्हटले की, “भुजबळ हे पक्ष संपवणारा आणि कार्यकर्त्यांना संपवणारा माणूस आहे. जे आता जीआरबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत, ते अगोदर कुठे झोपले होते, बैठकांना बोलावल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत. मराठा समाजात संभ्रम निर्माण होत नाही आणि होणारही नाही. मी मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात हे मराठ्यांना दिसणार. यामुळे मराठ्यांनी संभ्रम करून घेऊ नका,” असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले. Manoj Jarange |
हेही वाचा:





