Ajit Pawar Plan Crash: “…तर अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला नसता,” इस्कॉन अध्यक्ष सूरदासजींचे विधान
Ajit Pawar Plan Crash: ‘श्रीमद् भागवत’ ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास माणसाचा अपघाती मृत्यू ओढवत नाही, सूरदासजींचा विश्वास

Ajit Pawar Plan Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जानेवारी महिन्यात बारामती विमानतळाजवळ अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह एकूण पाच जणांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून, सीआयडीकडून याचा तपास केला जात आहे. एकीकडे अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ कायम असताना इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
श्रीमद् भागवत ग्रंथात अपार आध्यात्मिक शक्ती असून त्याचे नियमित वाचन करणाऱ्या व्यक्तीवर अशी अचानक आणि अपघाती वेळ येत नाही, अशी आपली श्रद्धा असल्याचे सूरदासजी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अजित पवार यांना देखील मी हा ग्रंथ दिला होता, परंतु त्यांनी हा ग्रंथ वाचला नसावा, असंही त्यांनी यावेळी सांगितले. अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना होती, असेही सूरदास यांनी म्हटले आहे.
डॉ. सुरदासजी नेमकं काय म्हणाले?
“मी गेल्या आषाढी एकादशीला अजित पवारजींना माझ्या स्वतःच्या हाताने ‘श्रीमद्भागवत’ हा ग्रंथ भेट दिला होता आणि मी त्यांना विनंती केली होती की, कृपया हा ग्रंथ आवर्जून वाचा. पण मला पूर्ण खात्री आहे की त्यांनी तो वाचला नसावा. त्या दिवशी अनेक पत्रकारही त्यांच्या दालनात उपस्थित होते. मी त्यांना आशीर्वाद देत सांगितले होते की, हा ग्रंथ आवर्जून वाचा. याला इतर सामान्य पुस्तकांसारखे समजू नका” असं वक्तव्य सूरदासजी यांनी केलं आहे.
अजित पवारांसारख्या मोठ्या नेतृत्वाचा असा अचानक जाणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि न भरून निघणारी हानी असल्याचे सांगत त्यांनी शोकही व्यक्त केला. Ajit Pawar Plan Crash
हेही वाचा:
Vande Mataram Controversy: ‘काँग्रेसने देशविरोधी निर्णय घेतला’ ; अमित शहांचा मोठा हल्ला






