Ajit Pawar: ‘…हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही,’ रोहित पवारांकडून अजितदादांचा व्हिडिओ शेअर
Ajit Pawar : आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला.

Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने यावर प्रतिक्रिया देत आहेत.
या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंपन्यांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी पोलीस आणि नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. बराच वेळ चाललेल्या या गोंधळानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांना एक लेखी पत्र दिले, ज्यामध्ये प्राप्त तक्रारीनुसार तपास करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
त्यानंतर रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताबाबत आज बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणार आहेत. त्यांनी बुधवारी मुंबईतील मरीन लाईन पोलीस ठाण्यातही याबाबत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.
बारामती पोलीस ठाण्यात ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद Ajit Pawar
याशिवाय अपघाताच्या दुसऱ्या दिवशी बारामती पोलीस ठाण्यात ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडून ब्लॅक बॉक्सबद्दल माहिती लपवली जात आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे.
अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत…😭
म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही…!#AjitdadaPawar pic.twitter.com/6JHA8SIZf2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 25, 2026
अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही
अजित पवारांच्या अपघाताबाबत गूढ वाढत जात असताना आता रोहित पवारांनी अजित पवारांचा खळखळून निरागसपणे हसतानाचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. “अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही, या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत. म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही…!” असं कॅप्शन रोहित पवारांनी या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा:





