“समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे”; नितीन गडकरींकडून सिंधुताईंना आदरांजली

पुणे: अनाथांच्या माई म्हणून संपूर्ण देशभरात परिचीत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच आज पुण्यात निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 4, 2022
“ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती,” असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली.





