शिरूर : कुलूप तोडून घरातील वस्तूंची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे येथील बांदल मळा शेतातील असणाऱ्या फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील वस्तूंची चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना ६ मार्च रोजी संध्याकाळी ५ ते ८ मार्च सकाळी ९ वाजण्याच्यापुर्वी शिरुर तालुक्यातील करडे गावच्या हद्दीत बांदलमळा येथे घडली आहे. याप्रकरणी राहुल गौतम कदम यांनी अज्ञात चोरट्याविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील करडे गावच्या हद्दीत बांदलमळा शेतातील गट क्रं.५८३ मध्ये फिर्यादी यांची बहीण मोनिका अशोक पवार हिच्या फार्म हाउस मर्धील घराचे कुलूप अज्ञात इसमाने तोडून घरात प्रवेश केला. घरातील टिव्ही, साउंड, गॅस सिलेडर टाकी, ड्रील मशिन, गोपी कंपनीचा मिक्सर, जेवनाची ३० स्टिलचे ताटे अशा एकुण अंदाजे २६ हजार ५०० रुपयांच्या वस्तु स्वताच्या फायद्या करीता अज्ञाताने चोरून नेल्या आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोते करत आहे.





