‘गो-पियुष’ ‘धन्वंतरी’! रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्याचा जगातील सर्वांत उपयुक्‍त “फॉर्म्युला’

Updated On:

पुणे -आयुर्वेद आणि ऍलोपॅथी दोन्ही क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आईचे आणि गायीचे पहिले दूध (गो-पियुष) आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्‍त असल्याचे मान्य केले आहे. गायीच्या पहिल्या दुधाचे हे महत्त्व जाणून “धन्वंतरी डिस्ट्रिब्युटर्स’ कंपनीने गायीच्या पहिल्या दुधातील पोषक घटकांपासून आरोग्यवर्धक “इम्युरीच’ ही औषधी तयार केली आहे. ही औषधी “धन्वंतरी डिस्ट्रिब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून पुणेकरांसाठी आणि संपूर्ण भारतीयांसाठी उपलब्ध झाली आहे. याबाबत “धन्वंतरी’कंपनीचे सीएमडी डॉ. रमेश पाटील (एमडी मेडिसिन), श्री. प्रकाश खलाटे, श्री. शशिकांत गुळुमकर यांच्याशी दैनिक “प्रभात’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी औषधीच्या विविध घटकांवर प्रकाश टाकला.

“गायीच्या पहिल्या दुधात असलेले “इम्युनो ग्लोब्युलिन्स’ हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. आपली रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्याचे काम ही औषधी करते,’ असे डॉ. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, “गुजरातच्या अहमदाबाद येथील “आरपीएस बायोटेक’ संस्था आशियातील पहिली संस्था आहे, ज्यांनी तयार केलेल्या “इम्युरीच’ औषधीमध्ये “इम्युनो ग्लोब्युलिन्स’ या घटकाचे 52% इतके उच्चांकी प्रमाण आहे. ही औषधी वैद्यकीय संस्थांकडून प्रमाणित करण्यात आली आहे. जगातील इतर कोणत्याही गो-पियुषामध्ये आजपर्यंत हे प्रमाण उपलब्ध झालेले नाही.

आज केवळ करोनाच नव्हे, तर 2009 मध्ये आलेल्या स्वाइन-फ्लूच्या काळातही “इम्युरीच’ लाखो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. गीर, खिलारी, कपिला यांसारख्या देशी गायींच्या पहिल्या दुधापासून ही औषधी तयार केली आहे. यासाठी देशभरातून सुमारे एक हजारांहून अधिक गायींना जिओ टॅगिंग करून त्यांच्यावर देखरेख केली जाते. हा प्रकल्प लवकरच महाराष्ट्रातही राबवण्यासाठी “धन्वंतरी’ प्रयत्न करत आहे. कारण, येथील खिलारी गायीचे पहिले दूध आणि त्यातील घटक सर्वाधिक गुणकारी आहेत.’

खलाटे म्हणाले, “संपूर्णपणे आयुर्वेदिक तत्वांच्या आधारित या औषधीचा उपयोग करोना योद्‌ध्यांना व्हावा, यासाठी करोना काळात आम्ही पुणे शहर आणि ग्रामीण-14,700 आणि सातारा येथील 700 पोलीस अधिकाऱ्यांना या औषधीचे वाटप केले. त्याबाबत पोलीस आयुक्तालयाने दिलेला “फीडबॅक’ अतिशय सकारात्मक होता आणि या औषधीमुळे पोलिसांना लाभ झाल्याचेही आयुक्‍तालयाने सांगितले. त्यामुळे पुणेकरांनीदेखील या औषधीचे सेवन करावे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवावी.’ या करोना काळात जगातील प्रत्येक व्यक्‍तीपर्यंत ही औषधी पोहचली पाहिजे, असे लक्ष्य धन्वंतरीचे संचालक श्री. शशिकांत गुळुमकर यांनी ठेवले आहे.

“आपल्याकडे गायीच्या पहिल्या दुधाबद्दल तसेच त्याच्या सेवनाबद्दल बरेच गैरसमज आहेत. हे दूध पिण्याऐवजी मिठाई बनविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. असे केल्याने त्यातील पोषकद्रव्ये नष्ट होतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही गैरसमज न बाळगता, या दुधाचे सेवन करावे.
– प्रकाश खलाटे, डॉ. रमेश पाटील, शशिकांत गुळुमकर
“धन्वंतरी डिस्ट्रिब्युशन प्रायव्हेट लिमिटेड’

आज पाहता येणार व्हिडिओ
गायीच्या पहिल्या दुधाचे फायदे आणि “इम्युरीच’ औषधीबद्दल अधिक माहिती देणारा व्हिडिओ आज सायंकाळी 7 वाजता दैनिक “प्रभात’च्या wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com या वेबसाइटवर प्रसारित करण्यात येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

2026-10-06 06:00:53

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव