महिला फुटबॉल संघाची बहरीनवर मात
Updated On:

मनामा – भारताच्या महिला फुटबॉल संघाने येथे सुरु असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत बहरीनचा 5-0 असा धुव्वा उडवला.
या सामन्यात भारताकडून प्यारी खाकाने 19 व 68 व्या, संगीता वासफोरने 13 व्या, इदूमतीने 34 व्या तर एस. मनीषाने 69 व्या मिनिटाला गोल केला व संघाचा विजय साकार केला.
जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारताचा महिला संघ 57 व्या स्थानावर असून बहरीनचा संघ 85 व्या स्थानावर आहे.





