‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

Asaduddin Owaisi Slams Pakistan । बहरीनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असलेले एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी शेजारील देशाला ‘अपयशी राष्ट्र’ म्हटले. तसेच त्यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजप खासदार बैजयंत पांडा करत आहेत. या शिष्टमंडळाने बहरीनमधील अनेक प्रमुख व्यक्तींना भेटले आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी एआयएमआयएम प्रमुख ओवेसी म्हणाले, “आमच्या सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कोणत्या प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे हे जगाला समजावून सांगण्यासाठी आम्हाला येथे पाठवले आहे. दुर्दैवाने, आमचे अनेक निष्पाप लोक मारले गेले आहेत. या समस्येचे मूळ पाकिस्तान आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे, मदत करणे आणि प्रायोजकत्व देणे थांबवत नाही तोपर्यंत हा धोका कायम राहील.”
#WATCH | Manama, Bahrain: During an interaction with the prominent personalities, AIMIM MP Asaduddin Owaisi says, “…Our govt has sent us over here…so that the world knows the threat India has been facing since last so many years. Unfortunately, we have lost so many innocent… pic.twitter.com/ckukFxpGAc
— ANI (@ANI) May 24, 2025
असदुद्दीन ओवेसीकडून पहलगाम हल्ल्याचा उल्लेख Asaduddin Owaisi Slams Pakistan ।
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “भारत आपल्या जनतेच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे आणि जर पाकिस्तानने पुन्हा काही चूक केली तर यावेळी त्याला खूप कडक प्रत्युत्तर दिले जाईल. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की या हल्ल्याने सामान्य लोकांचे जीवन कसे उद्ध्वस्त केले” असे म्हटले. तसेच ते पुढे म्हणाले, “एक महिला, जिचे लग्न होऊन फक्त सहा दिवस झाले होते, ती सातव्या दिवशी विधवा झाली. दुसरी महिला, जिचे लग्न दोन महिन्यांपूर्वी झाले होते, तिचा नवराही हल्ल्यात मारला गेला.”
एआयएमआयएम प्रमुखांनी जगाला केले ‘हे’ आवाहन Asaduddin Owaisi Slams Pakistan ।
एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, “भारताकडे मजबूत संरक्षण तंत्रज्ञान आणि ताकद आहे ज्याद्वारे ते आपल्या सर्व नागरिकांचे संरक्षण करू शकते.” दहशतवाद्यांना होणारा निधी थांबवण्यासाठी त्यांनी जगाला मदत करण्याचे आवाहन केले. पाकिस्तानचा पैसा दहशतवाद पसरवण्यासाठी वापरला जात असल्याने, पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारताला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी बहरीन सरकारला केले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजप खासदार बैजयंत पांडा करत आहेत आणि त्यात निशिकांत दुबे, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू, गुलाम नबी आझाद आणि राजदूत हर्ष श्रृंगला यांचा समावेश आहे.





