शिरूर शहरावरील पाणी संकट टळले

शिरूर : शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदी वरील कोल्हापुरी बंधाऱ्यात अखेर पाणी पोहोचले असून हे पाणी एक ते दीड महिना पुरणार असल्याची माहिती शिरूर नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी दिली. हे पाणी शिरूर पर्यंत येण्यासाठी अनेक अडचणी होत्या परंतु शिरूरचे आमदार अशोक पवार, यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वेळेत पाणी शिरूर शहरात दाखल झाले आहे.
शिरूर शहरावरील पाणीटंचाईचे संकट आमदार अशोक पवार यांचा प्रयत्नामुळे टळले असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.सध्या कोरोनाव्हायरस संकट असून जर पाणी टंचाई झाली असती तर शहराला मागील वर्षी सारखी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असता. त्यामुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंग चा कुठलाही ही नियम पाळला गेला नसता.
शिरूर शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाच सहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. हे पाणी कुकडी कॅनॉलमधून सोडण्याची मागणी नगरपरिषदेने केली होती. परंतु हे पाणी डिंबा धरणातून घोडनदी पात्रातून सोडले गेले. मागील वर्षी हे पाणी येण्यासाठी मोठा वेळ लागला होता. त्यामुळे शिरूर शहराला पाणी टंचाई निर्माण झाली होती. यावेळेस असेच होईल कि काय अशी शंका निर्माण झाली होती.
परंतु शिरूरचे आमदार अशोक पवार शिरूर नगरपालिकेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी याबाबत कडक भूमिका घेऊन हे पाणी लवकरात लवकर शिरूरला यावे पाणी कुठे साठवले किंवा अडवले जाऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती .
दोन महिना पुरेल एवढा पाणीसाठा आता शिरूर येथील घोडनदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यात जमा होणार असून, बंधारा पूर्ण क्षमतने भरण्यासाठी दोन दिवस लागणार आहे. शिरूर नगरपालिकेने आणखी एक आवर्तन शिल्लक असून हे आवर्तन ही लवकरच कुकडी कॅनलच्या चारी क्रमांक 61 मधून शिरूर शहराला मिळणार आहे असेही पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी सांगितले.
शिरूर शहरावरील पाणीटंचाईचे संकट असून पाणी दीड ते दोन महिने पुरणार आहे. शिरूर नगरीतील नागरिकांना कुठलाही पाणीटंचाईचा त्रास होणार नाही असं शिरूर नगरपालिकामुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.





