प्रतिक्षा संपली! ‘धर्मवीर २’ ची नवी रिलीज डेट जाहीर

Dharmaveer 2 Release Date| ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चाहते ‘धर्मवीर २’ ची आतुरतेनं वाट पाहत होते.
‘धर्मवीर – २’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी याबद्दल माहिती दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. पूरजन्य परिस्थितीमुळे काही गावं पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला होता.
View this post on Instagram
राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर २’ हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणं योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर इतक्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू’, असे मंगेश देसाई म्हणाले होते. Dharmaveer 2 Release Date|
त्यानंतर सोशल मीडियावर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची विचारणा केली जात होती. आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. २७ सप्टेंबरला ‘धर्मवीर २’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर लवकरच संपणार आहे. Dharmaveer 2 Release Date|
हेही वाचा:
सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुख स्पष्टच म्हणाले,’देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल’





