प्रतीक्षा संपली.! ‘पुष्पा-2’चा नवा टीझर रिलीज; अभिनेत्याचा ऍटिट्यूड पाहून तुम्हीही म्हणाल, झुकेगा नहीं…!!

नवी दिल्ली – अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच आतुरता लागली आहे. दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या पुष्पा या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुनने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले आहे. अशात पुष्पाच्या दुसऱ्या भागाबाबत आता एक अधिकृत खुलासा समोर आला आहे.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमध्ये सर्वांसाठी हिरो होता. अभिनेत्री रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती. म्हणूनच आता चाहत्यांना दुसऱ्या पर्वाचे वेड लागले आहे.
चित्रपट निर्मात्यांनी अधिकृत ट्विटरवर ‘पुष्पा 2’ बद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळाली. 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून पळून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. तो आता कुठे आहे, त्याची माहिती समोर आली आहे. आज (दि. 7) चित्रपट निर्मात्यांनी ‘पुष्पा 2’चा अधिकृत टिझर प्रदर्शित केला असून, सगळीकडे आता याच टीझरची चर्चा होताना दिसत आहे.
या टिझर मध्ये तुम्ही पाहू शकता की.., पुष्पाराजच्या शोधात भटकत असलेल्या पोलिसांच्या हाती महिनाभरानंतर त्याचा एक व्हिडीओ लागतो. हा व्हिडीओ जंगलातील आहे. आठ गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत असल्याचं यात दिसतं. जंगलात प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी लावलेल्या वनविभागाच्या कॅमेऱ्यात पुष्पा दिसतो. पुष्पाला पाहून वाघही दचकतो. या चित्रपटातील पुष्पाराजचा लुक एकदम जबरदस्त आहे. फॅन्सला देखील पुष्पाचा हा दमदार अंदाज चांगलाच आवडला आहे.





