अखेर प्रतीक्षा संपली…; बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचे धमाकेदार मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता रणबीर कपूर आणि आलीय भट्ट यांच्या बहुप्रतीक्षित ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमाचं ऑफिशल मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या मोशन पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर करण्यात आला असून, यामध्ये रणबीर म्हणतो… “जगात काहीतरी घडत आहे, ईशा, जे लोकांच्या आकलनापलीकडचे आहे. काही जुन्या शक्ती आहेत, काही शस्त्रे आहेत.”
यानंतर आलिया म्हणजेच ईशा म्हणते, “हे सर्व का पाहतोयस? तू कोण आहेस शिवा?”. या आशयाचे धमाकेदार पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार असून, ब्रह्मास्त्र हा पौराणिक कथानकावर आधारित सिनेमा आहे, असं म्हटलं जात आहे.





