प्रतिक्षा संपली ! बॉबी देओलच्या ‘आश्रम सीझन 3- पार्ट 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Aashram 3 Part 2 | अभिनेता बॉबी देओलचा ‘आश्रम सीझन 3- पार्ट 2’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये बाबा निरालाच्या साम्राज्यात निर्माण झालेली दरी, पम्मीच्या पुनरागमनामुळे जवळच्या मित्रांसोबत निर्माण झालेला तणाव आणि भोपा स्वामीची सत्तेची तहान याची झलक दिसते.
यात बाबा निराला पम्मीला मिळवण्याचा प्रयत्न करतो. तो पम्मीची तुरुंगातून सुटका करून आपल्या आश्रमात आणतो. यावेळी पम्मी बाबा निराला तसेच भोपा स्वामींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. पम्मीच्या बोलण्यात भोपा अडकतो आणि बाबा निरालाला ही गोष्ट कळते. आता बाबा निराला भोपाला संपवणार की पम्मीचा खेळ समजून घेणार? हे यात पाहायला मिळणार आहे.
‘आश्रम सीझन 3 पार्ट 2’ मध्ये बॉबी देओल, अदिती पोहनकर, दर्शन कुमार, चंदन रॉय सान्याल, विक्रम कोचर, त्रिधा चौधरी, अनुप्रिया गोएंका, राजीव सिद्धार्थ आणि ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 27 फेब्रुवारी पासून अॅमेझॉनची मोफत व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवा, अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर ही वेबसीरिज मोफत पाहता येणार आहे. Aashram 3 Part 2 |
View this post on Instagram
ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट केला आहे आणि मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हे मोबाईल अॅप, अॅमेझॉनचे शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि कनेक्टेड टीव्हीद्वारे उपलब्ध आहे. Aashram 3 Part 2 |
हेही वाचा:





