Raid 2 movie | अभिनेता अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘रेड 2’ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाच्या रिलीज डेटवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. ‘रेड 2’ हा सिनेमा आता १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण व्यतिरिक्त, रितेश देशमुख, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आज (दि. २८) या सिनेमाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. आता ‘रेड 2’साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पांढरा कुर्ता आणि नेहरू जॅकेट, रितेशचा लूक चर्चेत ! मंगळवार, २५ मार्च रोजी, ‘रेड २’ चित्रपटातील रितेश देशमुखची पहिली झलक समोर आली, ही झलक चित्रपटातील कलाकारांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. पोस्टरमध्ये, रितेश देशमुख लोकांमध्ये उभा असलेला दिसतोय, त्याने पांढरा कुर्ता आणि गडद तपकिरी रंगाचा नेहरू जॅकेट घातलेला आहे आणि एक हात वर केला आहे. त्याच्या जवळ उभे असलेले लोक हातात पक्षाचा झेंडा धरून आहेत. सिनेमात रितेश दादाभाई नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. हा एक राजकीय नेता असून, रितेशने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.