मतदाराने ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ
Updated On:

अहमदनगर – अहमदनगरमधील बाबुर्डी बेंद येथे एका मतदाराने ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे निवडणूक अधिकारी आणि पोलीस लगेच मतदान केंद्रात धावत आले. या मतदाराचे नाव जालिंदर चोभे असे आहे. ईव्हीएम मशीनला तीव्र विरोध असल्यानेच हे कृत्य केल्याचे समजते.
आज बाबुर्डी बेंद येथे मतदान केंद्रात गेल्यानंतर जालिंदर चोभे याने ईव्हीएम मशीनवर लोखंडी वस्तू मारून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी व पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी जालिंदर चोभे याला ताब्यात घेतले आहे.




