Salman Khan Bodyguard : ‘ते सलमानला गोळ्या झाडायला आले होते’; सलमान खानच्या बॅाडीगार्डचा धक्कादायक खुलासा, नेमकं प्रकरण काय?
Salman Khan Bodyguard : अभिनेता सलमान खानच्या खाजगी अंगरक्षाने धक्कादायक खुलासा केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

Salman Khan Bodyguard : 14 एप्रिल 2024 रोजी पहाटेच्या सुमारास बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्स या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात त्याच्या खाजगी अंगरक्षकाने न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे.
या प्रकरणाची सुनावणी गेल्या महिन्यापासून सुरू असून, अंगरक्षक पहिला साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर झाला होता. त्याने सांगितले की, 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता तो नेहमीप्रमाणे ड्युटीवर रुजू झाला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
अंगरक्षकाच्या म्हणण्यानुसार, पहाटे सुमारे 4 वाजता सुरक्षा कर्मचाऱ्यांना फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मोटरसायकलवर हेल्मेट घातलेले दोन हल्लेखोर इमारतीच्या दिशेने गोळीबार करताना दिसले. त्यांनी अंदाजे४ ते ५ गोळ्या झाडल्या.
हा हल्ला त्याच्या….
गोळीबारानंतर हल्लेखोर ‘आय लव्ह वांद्रे’ पॉईंटच्या दिशेने पसार झाले. विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज सादर केले, ज्यामध्ये अंगरक्षकाने हल्लेखोरांची ओळख पटवली. त्याने आपल्या साक्षीत स्पष्ट केले की, गोळीबाराच्या वेळी सलमान खान आपल्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये होता आणि हा हल्ला त्याच्या हत्येचा प्रयत्न होता, असा धक्कादायक खुलासा केला.
उलटतपासणीदरम्यान अंगरक्षकाने हेही नमूद केले की, अभिनेत्याला मिळणाऱ्या धमक्यांबाबत त्याला वैयक्तिक माहिती नव्हती. दरम्यान, 2 मे रोजी दुसरा साक्षीदार म्हणून एका पोलीस रक्षकाने न्यायालयात हजेरी लावली. त्याने सांगितले की, तो त्या वेळी लॉबीमध्ये होता. त्याने गोळीबार पाहिला नसला, तरी घटनास्थळी गोळ्यांच्या खुणा त्याला दिसल्या होत्या.





