Rohit Pawar: “गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर, पण…”; रोहित पवारांचे ट्वीट
Rohit Pawar: सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनेलचे १३ उमेदवार विजयी

Rohit Pawar: कोल्हापुरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. सत्ताधारी महायुतीच्या पॅनेलचा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेलचा विजय झाला. गोकुळ दूध संघात २५ संचालकपदांसाठी निवडणूक पार पडली होती.
या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनेलचे १३ उमेदवार विजयी झाले. तर महायुतीच्या पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले. गोकुळवर सत्ता हवी असेल तर 13 जागांचा जादुई आकडा गाठणे गरजेचे आहे. सतेज पाटलांच्या पॅनेलने हा आकडा पार केला. त्यामुळे आता गोकुळवर सत्तांतर होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, एका जागेसाठी मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. त्यानतंर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले. तर महायुतीच्या पॅनेलचे अमर पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलचा 13 तर महायुतीच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा एकूण 12 जागांवर विजय झाला. याच कारणामुळे महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. सतेज पाटील यांच्या गंभीर आरोपानंतर आता आमदार रोहित पवार यांनी देखील आरोप केले आहेत.
गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर आहे….!
पण…… आता खरा सत्तेचा दुरुपयोग सुरु झाल्याचं कळतंय. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरण्यासाठी सूत्रं हलवली जातायत.पण लक्षात ठेवा, जर का निकाल चोरण्याचा प्रयत्न केला तर गाठ प्रामाणिक सभासदांशी आहे.
घराबाहेरही पडू देणार नाहीत… नेत्यांनाही आणि पिलावळींनाही..!@INCMaharashtra
@satejp
@ruturajdyp#GokulElection2026 #गोकुळ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 19, 2026
रोहित पवार पोस्ट
रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, ‘गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर आहे. पण आता खरा सत्तेचा दुरुपयोग सुरु झाल्याचं कळतंय. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरण्यासाठी सूत्रं हलवली जातायत. लक्षात ठेवा, जर का निकाल चोरण्याचा प्रयत्न केला तर गाठ प्रामाणिक सभासदांशी आहे. घराबाहेरही पडू देणार नाहीत… नेत्यांनाही आणि पिलावळींनाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा:





