Dollar Vs Rupee: रुपयाचे मूल्य वाढले सहा पैशांनी
Updated On:

मुंबई – परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री चालूच आहे. त्याचबरोबर शेअर बाजाराचे निर्देशांक सातव्या दिवशी कमी झाले. मात्र अशा परिस्थितीतही रुपयांच्या मूल्यात सहा पैशाने सुधारणा होऊन रुपयाचे मूल्य 84 रुपये 40 पैसे प्रति डॉलर या पातळीवर आले. रिझर्व बँकेने हस्तक्षेप केल्यामुळे रुपयाच्या मूल्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असल्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर जागतिक अनिश्चितता वाढली असले तरी खनिज तेलाचे दर या आठवड्यात 71 डॉलर प्रति पिंप या पातळीवर असल्यामुळे रुपयाचे मूल्य सुधारण्यास मदत झाली असे सांगण्यात आले. मात्र रशिया -युक्रेन युद्ध चिघळण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळात रुपयाच्या मूल्यावर दबाव येण्याची शक्यता आहे.





