मुंबई – देशातील टीव्ही शो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सल्ल्याने बनवले जात आहेत. “एआय’द्वारे कमकुवत टीआरपी सुधारण्यासाठी उपायदेखील सुचवले जात आहेत. उदाहरणार्थ, एका वाहिनीवरील “प्यार का पहला नाम-राधा मोहन’ या शोचे रेटिंग घसरत होते. राधाला खलनायकाने फ्रीझरमध्ये बंद केले होते. त्यानंतर तांत्रिक टीमने एआयच्या मदतीने सांगितले की रेटिंग 36% ने कमी होईल. त्यानंतर, एआय स्क्रिप्ट “जीपीटी’ने राधासोबत फ्रीझरमध्ये उंदीर ठेवण्याचा सल्ला दिला. निर्मात्याने तेच केले आणि विशेष म्हणजे रेटिंग 21% सुधारले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञ आशिष फेरवानी म्हणतात, एआय पाच वर्षांत या क्षेत्रात 45 हजार कोटी रुपयांचे भांडवल जोडू शकते. यामुळे अनेक गोष्टी सुलभ होतील. एका क्षणात डझनभर भाषांमध्ये डबिंग आणि सबटायटलिंग करण्याची क्षमता असल्याने प्रत्येक शो, चित्रपट आणि संगीताची बाजारपेठ अनेक पटींनी वाढेल. डिसेंबरपर्यंत त्याच्या मदतीने चार भाषांमध्ये डबिंग आणि सबटायटल्स 98% अचूकतेसह शक्य होतील. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचे टेक्नॉलॉजी आणि डेटाचे अध्यक्ष नितीन मित्तल म्हणतात, एआय प्रकल्पावर कंपनी तीन वर्षांसाठी काम करत आहे. 42 हजार भाग आणि प्रेक्षकांचे पसंतीक्रम स्क्रिप्ट “जीपीटी’मध्ये जोडले गेले आहेत. आता ते 90% पर्यंत अचूक अंदाज देतात. किशोर कुमारच्या आवाजात “पसुरी’ गाणे ऐकणेही शक्य “एआय’च्या मदतीने तुम्ही किशोर कुमारच्या आवाजात “पसुरी’सारखे गाजलेले गाणे ऐकू शकता. अलीकडेच सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये मोहंमद रफी हे शाहरुख खानच्या “रब ने बना दी जोडी’ चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहेत. मात्र, हे शक्य आहे की, अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांच्याप्रमाणेच रफी यांचे कुटुंबीय कॉपीराइट उल्लंघनाबाबत कोर्टात जातील. कारण अनेक लेखक आणि अभिनेते त्यांचे चेहरे, वागणूक आणि छायाचित्रांबद्दल संवेदनशील असतात.