हौथींना अमेरिका पुन्हा जागतिक दहशतवादी घोषित करणार

वॉशिंग्टन – येमेनमधील हौथी बंडखोरांना अमेरिका पुन्हा एकदा जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष उल्लेख करून घोषित करणार आहे. व्हाईट हाऊसमधील या घडामोडींशी संबंधित व्यक्तींनी ही माहिती दिली आहे.
इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांनी गेल्या आठवड्यात लाल समुद्रातील डझनभर व्यापारी जहाजांवर हल्ले केले आहेत. इस्रायलकडून गाझामध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून हे हल्ले केले जात आहेत.
परदेशी दहशतवादी संघटना आणि विशेष उल्लेख असलेल्या जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीतून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये हौथींना बाहेर काढले आहे. येमेनमध्ये मानवतावादी मदत पोचवणे सोपे व्हावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
मानवी हक्क आणि मानवतावादी मदत गटांकडून घेतल्या गेलेल्या आक्षेपांमुळे ट्रम्प प्रशासनाने आपल्या अखेरच्या काही दिवसात हौथींना विदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये टाकले होते. यामुळे हौथींना मदत करण्यास अमेरिकेच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले होते.
मात्र या निर्बंधांनंतरही येमेनमधील मानवतावादी समस्या आणखीनच वाढल्या होत्या. मात्र बायडेन प्रशांसनाने आपल्या सुरुवातीच्या काही दिवसातच हौथींवरील हे निर्बंध मागे घेतले होते. मात्र येमेनमध्ये औषधे, अन्न आणि अन्य मदतीचा ओघ सुरू ठेवला गेला होता. त्यावर मोठी टीका झाली होती.
हौथींना जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यावर मदतीवर निर्बंध घातले जाणार नाहीत. हौथींकडून जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे.
त्यामुळे आघाडीने गेल्या आठवड्यात हौथींच्या ठिकाणांवर मारा केला गेला होता, असे व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलियन यांनी म्हटले आहे. स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.





